मालवण | सहिष्णू पंडित : (विशेष वृत्त ) : मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कु. सोहम बाबू घाडीगांवकर हा इयत्ता आठवीतील मुलगा सध्या दापोलीच्या गोल्ड व्हॅलीतील त्याच्या घरासमोरील अंगण व त्यातील किल्ल्यामुळे सर्वांच्याच प्रशंसेचा मुद्दा बनला आहे.
दिवाळी निमित्त बच्चेकंपनी किल्ले बनविणे आणि विविध चैतन्यदायी उपक्रम राबवत असतात. पालकांचाही त्यांना बर्यापैकी पाठिंबाही मिळतो. हे किल्ले बनवताना खूपदा माती आणि टाकाऊ वस्तूंचा वापरही केला जातो.परंतु इथेच सोहम बाबू घाडीगांवकर व त्याच्यासारखा विचार करणारी मुले वेगळी ठरतात. सोहमने छत्रपतींच्या निसर्गाधिष्ठीत स्थापत्य शास्त्राच्या आग्रही आज्ञेचे तंतोतंत पालन करुन त्याच्या अंगणातील किल्ला बनविला आहे.
नैसर्गिक साधने व नैसर्गिक रंग वापरून सोहमने हा किल्ला उभारला आहे म्हणून तो दापोली गोल्ड व्हॅली आणि इतर डिजिटल सामाजिक मंचांवर कौतुकाचा विषय ठरला आहे…
आणि म्हणूनच सोहम बनलाय छत्रपतींच्या स्वप्नातील व आज्ञेतील निसर्गाधिष्ठीत छोटा किल्लेदार…!
अभिनंदन सोहम.