24 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

मालवणात नगरसेवक मंदार केणी पुरस्कृत महापुरुष रेवतळे आयोजीत नरकासूर स्पर्धेची उत्सुकता..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | मिलिंद माणगांवकर : गेली दोन वर्षे थोड्या भयाच्या छायेखाली वावरणारे ‘प्रतिकात्मक नरकासूर दहन प्रेमी’, आता यावर्षी उत्साहात त्यांच्या कलागुणांना वाव देत देत नरकासूर बनवून त्याच्या पुतळ्याचे दहन करतील. याद्वारे समाजातील अरिष्ट, खलवृत्ती नाहीशी होत समाजात पुन्हा चैतन्य नांदेल.  यादरम्यान कोरोनाविषयक खबरदारी घेऊन आरोग्यही नीट राखता येईलच अशा बहुउद्देशीय नरकासूर दहन कार्यक्रमाचे आयोजन यंदा सर्वत्र उत्साहात होत आहेच.
मालवणचे नगरसेवक मंदार केणी आणि महापुरुष रेवतळे यांनी असाच विचार लक्षात घेत नरकासूर दहन स्पर्धा आयोजित केली आहे.
दिनांक तीन नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता ही स्पर्धा सुरु होणार असून रात्री बारापर्यंत भरडनाका इथे आणल्या जाणार्या नरकासूर प्रतिमांनाच स्पर्धेसाठी पात्र ठरविले जाईल.
दिनांक तीन नोव्हेंबरला नऊ वाजेपर्यंत नांवनोंदणी केली जाणार असून या स्पर्धेतील माननीय परिक्षक व आयोजकांचा निर्णय हाच अंतिम राहील असे सांगण्यात आले आहे.
नांव नोंदणीकरिता सिद्धेश मांजरेकर 7021981280 आणि ललित चव्हाण 9096728048 यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | मिलिंद माणगांवकर : गेली दोन वर्षे थोड्या भयाच्या छायेखाली वावरणारे 'प्रतिकात्मक नरकासूर दहन प्रेमी', आता यावर्षी उत्साहात त्यांच्या कलागुणांना वाव देत देत नरकासूर बनवून त्याच्या पुतळ्याचे दहन करतील. याद्वारे समाजातील अरिष्ट, खलवृत्ती नाहीशी होत समाजात पुन्हा चैतन्य नांदेल.  यादरम्यान कोरोनाविषयक खबरदारी घेऊन आरोग्यही नीट राखता येईलच अशा बहुउद्देशीय नरकासूर दहन कार्यक्रमाचे आयोजन यंदा सर्वत्र उत्साहात होत आहेच.
मालवणचे नगरसेवक मंदार केणी आणि महापुरुष रेवतळे यांनी असाच विचार लक्षात घेत नरकासूर दहन स्पर्धा आयोजित केली आहे.
दिनांक तीन नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता ही स्पर्धा सुरु होणार असून रात्री बारापर्यंत भरडनाका इथे आणल्या जाणार्या नरकासूर प्रतिमांनाच स्पर्धेसाठी पात्र ठरविले जाईल.
दिनांक तीन नोव्हेंबरला नऊ वाजेपर्यंत नांवनोंदणी केली जाणार असून या स्पर्धेतील माननीय परिक्षक व आयोजकांचा निर्णय हाच अंतिम राहील असे सांगण्यात आले आहे.
नांव नोंदणीकरिता सिद्धेश मांजरेकर 7021981280 आणि ललित चव्हाण 9096728048 यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!