जलजीविका संस्था आणि नीलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन संस्था मालवण यांचा कार्यक्रम.
मालवण | प्रतिनिधी : जलजीविका संस्था आणि नीलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन संस्था मालवण यांच्या संयुक्त विद्यमान समुद्री शेवाळ विषयक व्यावहारिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या प्रशिक्षणा अंतर्गत समुद्री शेवाळाचे आर्थिक फायदे, बांबू आणि तराफा राफ्ट बांधणी, समुद्री शेवाळ काढण्याचा पद्धती, समुद्री शेवाळ वाळवणे आणि त्यावर प्रक्रिया करायच्या पद्धती, समुद्री शेवाळ संबंधी आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता, समुद्री शेवाळ संबंधी सरकारी योजना आदी विषयांची माहिती दिली जाणार आहे.
या प्रशिक्षणाचे फायदे असे आहेत की हे प्रशिक्षण घेतल्यानंतर ASCI (Agriculture Skill Council of India) द्वारे जे प्रमाणपत्र मिळते ते सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते तसेच दोन दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागीला ५०० रुपये मिळतील. जर उमेदवाराला समुद्री शेवाळ लागवडीत रस असेल, तर त्यांना जलजीविकाकडून आणि निलक्रांती कडून तांत्रिक मदत देखिल मिळेल.
या प्रशिक्षणासाठी उमेदवार वैध जात प्रमाणपत्रासह SC/ ST समुदायाचा असावा आणि या प्रशिक्षणासाठी Stipend मिळविण्यासाठी उमेदवाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे. उमेदवार २० ते ४० वयोगटातील असावा. उमेदवाराचे शिक्षण किमान दहावीपर्यंत असावे.
या संदर्भात संपूर्ण माहितीसाठी व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तारखांसाठी, नीलक्रांती संस्था 8805833518, राज पवार: 8830254400, सृष्टी सुर्वे: 8080295123, समृद्धी संगारे: 8624987904, ओंकार बळेल: 9730073306 यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.