26.6 C
Mālvan
Sunday, September 22, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

प्राथमिक शिक्षक समितीचे १ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन !

- Advertisement -
- Advertisement -

सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी विविध प्रलंबित मागण्यांचा लक्षवेध करण्यासाठी शिक्षक समितीचा पुढाकार ; जिल्हाध्यक्ष नितीन कदम

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : विद्यार्थी व प्राथमिक शिक्षकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने १ नोव्हेंबर रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व मागण्या मंजूर करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. याकरिता अशाप्रकारचे निवेदन राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्यसरचिटणीस विजय कोंबे, यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, आयुक्त, संचालक आदींना दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी व प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मधील इयत्ता १ ते ८ च्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात यावा, मागासवर्गीय आणि दारिद्र्य रेषेखालील मुलींना एक रुपया ऐवजी २५ रू उपस्थिती भत्ता लागू करावा, शिक्षण सेवक यांचे मानधन ६००० रू वरून २५ हजार रू करणे, सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या व पदवीधर शिक्षकांबाबतच्या त्रुटी दूर कराव्यात, वस्तीवाळा शिक्षकांची सुरूवातीची नियुक्ती तारीख सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावी, अंशदान पेन्शन धारक शिक्षकांच्या वेतनातून कपात झालेल्या रक्कमांचा हिशोब घोळ पूर्ण करावा, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, १३ आॅक्टोबर २००६ चे परिपत्रक रद्द करून सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, जून २०१४ ची अधिसूचना रद्द करून केंद्रप्रमुखांच्या सर्व रिक्त जागा शिक्षकामधूनच भरण्यात यावीत,ग्रामीण भागात मुख्यालयी राहण्याचे ९ सप्टेंबर २०१९ चे परिपत्रक रद्द करण्यात यावे, आंतरजिल्हा बदली मधील जाचक अटी रद्द करून आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत शिक्षकांच्या बदल्याची कार्यवाही त्वरीत सुरू करावी, आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समिती जिल्हाशाखा सिंधुदुर्ग च्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयसमोर जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांचे नेतृत्वाखाली धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्हयातील सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने करण्यात येत आहे.
या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, चंद्रकांत अणावकर, राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर,कोकण विभागीय उपाध्यक्ष शरद नारकर, राज्य संघटक डी बी कदम, राज्य महिला आघाडी सल्लागार सुरेखा कदम, शिक्षक नेते नंदकुमार राणे, जिल्हा प्रवक्ता सुनिल चव्हाण, कार्याध्यक्ष नारायण नाईक, उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, लवू चव्हाण, कोषाध्यक्ष लहू दहिफळे, कार्यालयीन चिटणीस आपा सावंत, संतोष कुडाळकर, प्रसिद्धी प्रमुख प्रफुल्ल जाधव,संपर्क प्रमुख प्रशांत मडगावकर, गिल्बर्ट फर्नांडिस सुधीर गोसावी,जिल्हाउपाध्यक्ष उदय शिरोडकर, तुषार आरोसकर प्रकाश झाडे, सुहास रावराणे, , सर्व तालुकाशाखांचे तालुकाध्यक्ष व सचिव आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर आंदोलनात कोवीड 19 च्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. असे जिल्हाध्यक्ष नितीन कदम व जिल्हासरचिटणीस सचिन मदने यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!