मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातल्या मसुरे कावावाडी येथील श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट यांच्या वतीने पंचक्रोशितील शालेय विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इ.१० वी, इ.१२ वी आणि पदवी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या ६०% वरील विद्यार्थांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला. तसेच इतर विद्यार्थांना वह्यावाटप कावावाडी येथील पेडणेकर बंधू निवास येथे झाले.
प्राथमिक विद्यालय मसुरे डांगमोडे ७ विद्यार्थी ,जिल्हा परिषद पू.प्रा.शाळा वेरली २५ विद्यार्थी, जि.प.शाळा मागवणे ४ विद्यार्थी, भरतगड इंग्लिश मिडीयम एस.एस.सी., आर.पी.बागवे हायस्कूल आणि मसुरे कावावाडी जि.परिषद शाळा १७ विद्यार्थि उपस्थित होते. आर.पी.बागवे हायस्कूल एस.एस.सी. यशवंत
कु.वैष्णवी दत्ताराम सावंत -८९%, कु.पियुष संजय बागवे – ८८.४०%, कु.चेतन अनिल दुखंडे – ७७.४०%. भरतगड इंग्लिश मिडीयम एस. एस. सी. कु. बाबुराव समिर परब – ९०%,
कु.वरद सतिश वाळके – ८६.४०%, कु.अच्युत अजय प्रभूगांवकर -८५%.यांचा तसेच कावावाडी मसुरे येथील कु. राज संजय हिंदळेकर – बी. एस. सी. केमिस्ट्री, कु.अमेय राजन पेडणेकर – ९३%, कु.मिताली दिपक मसुरकर- ७७%, कु.आयुष राजन करंजेकर – ७०%,कु. ऐश्वर्य मंगेश पेडणेकर- ७८%, कु.संस्कृती प्रशांत गोलतकर – ६२%, कु.मनिष रामदास गिरकर (एच.एस.सी.) – ६२%यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री शरद रावजी पेडणेकर, खजिनदार श्री राजाराम दिनकर खोत, श्री दिनू पेडणेकर, श्री परमानंद पेडणेकर, श्री समिर पेडणेकर, श्री साईप्रसाद पेडणेकर,श्री काशिनाथ पेडणेकर,श्री चंद्रकात पेडणेकर, श्री बबन पेडणेकर, श्री रमण पेडणेकर, कु. निखिल पेडणेकर, कु. पियुष पेडणेकर, कु.सिद्धेश पेडणेकर, मधुरा पेडणेकर, सौ.प्रियंका पेडणेकर, सौ.पल्लवी पेडणेकर, कु. दर्शित पेडणेकर, सुजाता पेडणेकर, सौ. सायली पेडणेकर, सौ.अनुजा पेडणेकर, श्री दिपक हिंदळेकर, श्री दिगंबर गोलतकर, श्री गिरकर,कु. किरण पेडणेकर, कु.निधी पेडणेकर, सौ.मनस्वी येसाजी, श्री अरूण आंबेरकर, श्री दिपक कातवणकर, श्री संजय मसुरकर तसेच कावावाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.