मालवण | प्रतिनिधी (सुयोग पंडित) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या शिवाजी वाचन मंदिर, भरड येथे १० मार्चला, आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२४ साजरा करण्यात आला. गेली ३० वर्षे, शिवाजी वाचन मंदिर यांच्यावतीने समाजातील सामान्य स्तरावर सक्रीय किंवा उल्लेखनीय योगदान दिलेल्या महिलांना या निमित्ताने विशेष कार्यक्रमाद्वारे गौरविण्यात येते.
सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाची सुरवात झाली. शिवाजी वाचन मंदिरचे पदाधिकारी डाॅ. सुभाष दिघे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी सौ. अनिता आळवे आणि श्रीमती सुहासिनी माणगांवकर यांचा त्यांचे कणखर व्यक्तिमत्व आणि सक्रीय सामाजिक योगदान या बद्दल सत्कार करण्यात आला. ( शिवाजी वाचन मंदिरच्या पदाधिकारी सौ. वैदेही जुवाटकर यांनी दोन्ही सत्कार मूर्तींचा जीवन पट सोशल मिडिया मंचाद्वारेही विशेष लेखनातून उलगडला. )
या कार्यक्रमाला डाॅ. सुभाष दिघे, उद्योजक व कवी रुजारीओ पिंटो, शिवाजी वाचन मंदिरच्या पदाधिकारी वैदेही जुवाटकर, कर्मचारी शांभवी कोळगे सत्कारमूर्ती सौ. अनिता आळवे, श्रीमती सुहासिनी माणगांवकर आणि मान्यवर तसेच मालवणवासिय उपस्थित होते. शिवाजी वाचन मंदिर तर्फे उपस्थित सर्वांचे व सहकारी घटकांचे आभार मानण्यात आले.