29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न ; मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्यासह पुरुष कर्मचारी वृंदाने सादर केलेले प्रहसन ठरले विशेष..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोजरी इंग्लिश स्कूल येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. ८ मार्चच्या महिला दिन अनुषंगाने ९ मार्चला हे कार्यक्रम प्रशालेच्या मंचावर सादर झाले. इयत्ता ७ वी चे विद्यार्थी व सूत्रसंचालक कु. अद्वैत अमित पालव व कु. केतक गणेश मेस्त्री यांनी मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस, सर्व शिक्षक शिक्षिका व उपस्थित सर्वांचे सर्वांचे स्वागत केले.

प्रशालेच्या दैनंदिन प्रार्थना व परीपाठानंतर इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याद्वारे स्त्रीच्या विविध रुपांचा जागर केला. इयत्ता ७ वीच्या कु. दुर्वा पवार हिचे भाषण झाले. प्रशालेचे क्रीडा व विषय शिक्षक श्री. स्वप्नील तांबे यांनी त्यांच्या भाषणाद्वारे महिलांबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त केले. यानंतर मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्या मनोगतात त्यांनी स्त्रीच्या अस्तित्वाची महती कथन केली. यादरम्यान शिक्षिका व महिला कर्मचारी यांसाठी विविध मनोरंजक खेळ व भेटवस्तू वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस व पुरुष कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी स्त्री शिक्षणाविषयी सादर केलेले प्रहसन सादर केले. उपस्थित सर्वांनी या प्रहसनाला उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी महिला कर्मचारी, विद्यार्थीनी व सर्व शिक्षिकांच्या वतीने शिक्षिका सौ. डायना कोयलो यांनी सर्वांचे आभार मानले.

प्रशालेचे कर्मचारी श्री. नितेश म्हसकर यांनी मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस व सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोजरी इंग्लिश स्कूल येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. ८ मार्चच्या महिला दिन अनुषंगाने ९ मार्चला हे कार्यक्रम प्रशालेच्या मंचावर सादर झाले. इयत्ता ७ वी चे विद्यार्थी व सूत्रसंचालक कु. अद्वैत अमित पालव व कु. केतक गणेश मेस्त्री यांनी मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस, सर्व शिक्षक शिक्षिका व उपस्थित सर्वांचे सर्वांचे स्वागत केले.

प्रशालेच्या दैनंदिन प्रार्थना व परीपाठानंतर इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याद्वारे स्त्रीच्या विविध रुपांचा जागर केला. इयत्ता ७ वीच्या कु. दुर्वा पवार हिचे भाषण झाले. प्रशालेचे क्रीडा व विषय शिक्षक श्री. स्वप्नील तांबे यांनी त्यांच्या भाषणाद्वारे महिलांबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त केले. यानंतर मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्या मनोगतात त्यांनी स्त्रीच्या अस्तित्वाची महती कथन केली. यादरम्यान शिक्षिका व महिला कर्मचारी यांसाठी विविध मनोरंजक खेळ व भेटवस्तू वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस व पुरुष कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी स्त्री शिक्षणाविषयी सादर केलेले प्रहसन सादर केले. उपस्थित सर्वांनी या प्रहसनाला उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी महिला कर्मचारी, विद्यार्थीनी व सर्व शिक्षिकांच्या वतीने शिक्षिका सौ. डायना कोयलो यांनी सर्वांचे आभार मानले.

प्रशालेचे कर्मचारी श्री. नितेश म्हसकर यांनी मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस व सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली.

error: Content is protected !!