मालवण | सुयोग पंडित : मालवण एस टी स्टॅन्ड नजिकच्या श्रीराम मंदिर व प्रांगणात श्री. गजानन महाराज, शेगांव यांच्या प्रकटदिन सोहळ्याचे औचित्य साधून रविवारी ३ मार्चला विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी ५ :३० वाजता सनई चौघड्याने प्रकटदिनाच्या कार्यक्रमाची सुरवात झाली त्यानंतर श्री. गजानन विजय ग्रंथाचे साखळी पारायण सुरु झाले. ८ वाजता श्री गजानन महाराजांची महापूजा विधी झाला.
दुपारी १२ वाजता आरती व नैवेद्य कार्यक्रम झाला. दुपारी १ ते ३ झुणका – भाकरी प्रसादाचा कार्यक्रम झाला ज्याचा लाभ असंख्य भाविक भक्तांनी घेतला. संध्याकाळी ४ वाजल्यापासून तीर्थ प्रसाद वाटप सुरु झाले आणि ५ वाजता अष्टपैलू कला निकेतन, मालवण यांचे भजन सादरीकरण झाले. ७ वाजता स्थानिक कलाकारांनी श्री गजानन विजय ग्रंथावर आधारीत ट्रिक सिन सादर झाला. रात्री ८ वाजता दशावतारी दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा ‘स्वामी अन्नपूर्णा’ हा पौराणिक व ट्रिकसिन्ससहीत नाट्यप्रयोग सादर झाला.