राठीवडेतील विश्वकर्मा मंदिर येथे सभामंडप तथा सांस्कृतिक सभागृह मंजूर केल्याबद्दल सुतार समाजाने मानले आ. वैभव नाईक यांचे आभार ; विश्वकर्मा जयंतीचे औचित्य.
मालवण | ब्यूरो न्यूज : निधी अभावी गेली ५ ते ६ वर्षे राठिवडे येथील विश्वकर्मा मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम रखडले होते. आमदार वैभव नाईक यांच्याकडे सुतार समाजाने मागणी करताच त्यांनी २५ लाखाचा निधी मंजूर करून दिला. आज या सभामंडपाचे भूमिपूजन कऱण्यात आले हि आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी आम्ही सर्व ग्रामस्थ आहोत. ते पक्षभेद विसरून काम करीत असून त्यांच्या कामाचे आपल्याला कौतुक आहे असे गौरवोद्गार भाजपच्या माजी जि. प अध्यक्षा शोभा पांचाळ यांनी काढले. तर आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल मालवण तालुका सुतार समाज कायम त्यांचा ऋणी राहील असे उद्गार समाज मंडळाचे अध्यक्ष कल्याण मेस्त्री यांनी काढले.
मालवण तालुका सुतार समाजाच्या वतीने गुरुवारी राठिवडे गोंजीचीवाडी येथील श्री विश्वकर्मा मंदिरात श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याठिकाणच्या सभामंडपासाठी आमदार वैभव नाईक यांनी २५ लाख रु निधी मंजूर करून दिला असून आ. वैभव नाईक यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
या प्रसंगी आमदार वैभव नाईक म्हणाले की राठिवडे येथे मालवण तालुक्यातील एकमेव असलेल्या विश्वकर्मा मंदिराच्या सभागृहाचे काम करण्याचे भाग्य मला श्री विश्वकर्माच्या आशीर्वादाने लाभले आहे. सुतार समाज संघटित झाला पाहिजे यासाठी सुतार समाज मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. लवकरात लवकर सभामंडपाचे काम पूर्ण करून पुढच्या वर्षी भव्य सभामंडपात श्री विश्वकर्मा जयंती कार्यक्रम होईल असा विश्वास आ. वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी भाजपच्या माजी जि. प अध्यक्षा शोभा पांचाळ, शिवसेना उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, आडवली विभागप्रमुख बंडू चव्हाण, युवासेना उप जिल्हाप्रमुख पंकज वर्दम, सरपंच दिव्या धुरी, उपसरपंच स्वप्नील पुजारे, मालवण तालुका सुतार समाज मंडळाचे अध्यक्ष कल्याण मेस्त्री, उपाध्यक्ष कल्याण अनावकर, सचिव युवराज मेस्त्री, विभाग संघटक संतोष घाडी, प्रशांत सावंत, दुलाजी परब, अरुण लाड, विजय पालव, राजू मेस्त्री, सुभाष धुरी, समाज मंडळाचे शामसुंदर मेस्त्री, सुहानी मेस्त्री, अस्मिता मेस्त्री, सत्यवान मेस्त्री, विष्णू मेस्त्री, संतोष मेस्त्री, महेश मेस्त्री, सुभाष मेस्त्री, दीनानाथ मेस्त्री यांसह मोठ्या संख्येने सुतार समाज महिला व बांधव महिला उपस्थित होते.