28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

मैत्रेय गुंतवणुकदार आणि प्रतिनिधी काढणार शासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी व पोलीस मुख्यालयावर विराट मोर्चा ; मालवणमधील पिडीत मैत्रेय प्रतिनिधी व पिडीत गुंतवणूकदारांच्या सभेत एकमताने ठराव.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्रातील २७ लाख जनतेच्या अदाजे २८००कोटी ची फसवणुक केल्या प्रकरणी मैत्रेय गृपविरुद्ध कंपनीविरुद्ध २०१६ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. (गु.र.न. ३४ /२०१६) मा. जिल्हा विशेष व सत्र न्यायालयात सो नाशिक याचे कोर्टात दोषारोप पत्र ३५ / २०१६ दाखल केले झाले होते. मुंबई न्यायालया (औरंगाबाद खंडपीठ) WP NO १३६२/२०१८ मध्ये झालेल्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने M P I D ACT नुसार १७ मे २०१८ रोजी सक्षम प्राधीकारी तथा उपजिल्हाधिकारी मुंबई याची संपुर्ण राज्यासाठी नेमणूक केली गेली होती. आता या घोटाळयाला ८ वर्षे उलटून गेली तरीही अद्याप किती मालमत्ता जप्त करण्यात आली त्याची लीलाव प्रक्रिया याबाबत सामान्य गुंतवणूकदार जेव्हा मा. जिल्हाधिकारी, DGP मुंबई तसेच अन्य संबधीत अधिकारी यांना पत्राद्वारे विचारणा केली असता, ‘कार्यवाही सुरू आहे’, एवढेच कळवण्यात येते. हे जनतेचे काम जलद गतीने का होत नाही, महाराष्ट्रातील ३५० हुन जास्त मालमत्ता जप्त करण्यात आली आहे , ती विकुन लोकांना पैसे द्यायला शासकीय अधिकारी यांचेकडून विंलब का होत आहे? आम्हा सामान्य गुंतवणूकदार याना आमच्या हयातीत रक्कम मिळाली नाही तर ‘न्यायाला विलंब म्हणजे न्यायाला नकार’ या तत्त्वानुसार आमच्यावर एकप्रकारे अन्याय होणारा आहे, असे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. शासकीय अधिकारी आपला चेंडू न्यायालयाकडे फेकत आहे आणि कोर्टाचे रोजनामा पाहीले तर अधिकारी कोर्टाच्या आदेशाचे पालन करत नसल्याचे दिसून येते अशी गुंतवणुकदारांची संतापजनक खंत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंदाजे २५ हजर गुंतवणूकदार लवकर न्याय मिळावा म्हणून प्रयत्न देखील करत आहेत, आणि आता सहनशक्तीचा अंत झाल्याने तसेच महिला प्रतिनिधी यांना मागील ७ वर्षात झालेल्या त्रास या मुळे जिल्ह्य़ातील सामान्य गुंतवणूक दार महाराष्ट्र शासनाच्या आणि शासकीय अधिकारी यांच्या ढिसाळपणा व दिरंगाई मुळे झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शांततेच्या मार्गाने शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. या निषेध मोर्चाचे नियोजन काल ३ फेब्रुवारीला, मालवण राजकोट येथील शासकीय विश्रामगृहाजवळ जमलेल्या मैत्रेय गुंतवणूकदार आणि प्रतिनिधी यांच्या छोटेखानी सभेत एकमताने मांडले. तसेच याबाबतीतले पुढील सभा वेगवेगळ्या तालुक्यात आयोजित केल्या जाणार आहेत. सर्वानुमते एक दिवस ठरवून जिल्हा पोलीस कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात भव्य मोर्चा निघणार असल्याची माहिती मालवणचे गुंतवणूकदार जहीर शेख, मिलिंद झाड, शेखर कोचरेकर, लवू केळुस्कर, गया ढोके, अजिंक्य आस्वलकर, गणपत केळुसकर, श्रद्धा वेंगुर्लेकर, सानिका तुळसकर, काजल तोडणकर तसेच अन्य उपस्थित २० गुंतवणूक दार यांनी मालवण येथे दिली आहे तसेच जास्तीत जास्त गुंतवणूक दार यांनी या मोर्चात सहभागी व्हावे यासाठी आवाहन देखील केले आहे.

सिंधुदुर्गातील अंदाजे ३५ हजार गुंतवणूकदार यांचे मैत्रेय कंपनीत ठेवी अडकल्या आहेत. सध्या पूर्ण महाराष्ट्रात्यील लोकांच्या ठेवी लवकरात लवकर मिळाव्या यासाठी ची केस मा. सेशन कोर्ट मुंबई येथे चालू आहे. (Special Case No. 101148/2022) महाराष्ट्र शासनाने मैत्रेय कंपनीचे अंदाजे महाराष्ट्रातील ३५० मालमत्ता जप्त केल्या आहेत व ती विकण्यासाठी त्याचे नोटिफिकेशन बनवले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे व कोर्टाने मालमत्ता विकण्याचे आदेश अद्याप पर्यंत दिले नाहीत. ते आदेश लवकरच दिले जातील यासाठी कोर्टात प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्र शासनाने सन २०१९ च्या नोटिफिकेशन च्या माध्यमातून सामान्य गुंतवणूक दारांना आवाहन केले होते कि, आपल्या पैसे मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या शासकीय विभागांना पत्र व्यवहार न करता आपण आपल्या जिल्ह्यातील मुख्य पोलीस मुख्यालय येथे आपले मैत्रेय पोलिसी बाबत ची सर्व माहिती आर्थिक गुन्हा अन्वेक्षण विभाग यांना अर्जाद्वारे द्यावी. परंतु मधल्या काळात कोरोना आल्याने काही गुंतवणूक दार यांचे जिल्हा प्रशासन कडे अर्ज पोहचले नाहीत, तरी उवरीत सामान्य सामान्य गुंतवणूक दरांचे अर्ज शासनाने स्वीकारून ते मुंबई ला पाठवावे तसेच सदर केस च काम बघणारे मुंबई येथील आर्थिक गुन्हे अन्वेक्षण विभाग येथील शासकीय अधिकारी यांनी कोर्टला सहकार्य करून कोर्टाचे आदेशाचे पालन त्वरित करावे तसेच अजूनपर्यंत ज्या मालमत्ता जप्त केल्या नाहीत त्या जप्त करावेत, मुख्यता महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील जेणेकरून लवकरात लवकर केस चा निर्णय लागेल यासाठी म्हुणुन मैत्रेय गुंतवणूक दार निषेध मोर्चा वेळी निवेदन देणार आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्रातील २७ लाख जनतेच्या अदाजे २८००कोटी ची फसवणुक केल्या प्रकरणी मैत्रेय गृपविरुद्ध कंपनीविरुद्ध २०१६ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. (गु.र.न. ३४ /२०१६) मा. जिल्हा विशेष व सत्र न्यायालयात सो नाशिक याचे कोर्टात दोषारोप पत्र ३५ / २०१६ दाखल केले झाले होते. मुंबई न्यायालया (औरंगाबाद खंडपीठ) WP NO १३६२/२०१८ मध्ये झालेल्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने M P I D ACT नुसार १७ मे २०१८ रोजी सक्षम प्राधीकारी तथा उपजिल्हाधिकारी मुंबई याची संपुर्ण राज्यासाठी नेमणूक केली गेली होती. आता या घोटाळयाला ८ वर्षे उलटून गेली तरीही अद्याप किती मालमत्ता जप्त करण्यात आली त्याची लीलाव प्रक्रिया याबाबत सामान्य गुंतवणूकदार जेव्हा मा. जिल्हाधिकारी, DGP मुंबई तसेच अन्य संबधीत अधिकारी यांना पत्राद्वारे विचारणा केली असता, 'कार्यवाही सुरू आहे', एवढेच कळवण्यात येते. हे जनतेचे काम जलद गतीने का होत नाही, महाराष्ट्रातील ३५० हुन जास्त मालमत्ता जप्त करण्यात आली आहे , ती विकुन लोकांना पैसे द्यायला शासकीय अधिकारी यांचेकडून विंलब का होत आहे? आम्हा सामान्य गुंतवणूकदार याना आमच्या हयातीत रक्कम मिळाली नाही तर 'न्यायाला विलंब म्हणजे न्यायाला नकार' या तत्त्वानुसार आमच्यावर एकप्रकारे अन्याय होणारा आहे, असे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. शासकीय अधिकारी आपला चेंडू न्यायालयाकडे फेकत आहे आणि कोर्टाचे रोजनामा पाहीले तर अधिकारी कोर्टाच्या आदेशाचे पालन करत नसल्याचे दिसून येते अशी गुंतवणुकदारांची संतापजनक खंत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंदाजे २५ हजर गुंतवणूकदार लवकर न्याय मिळावा म्हणून प्रयत्न देखील करत आहेत, आणि आता सहनशक्तीचा अंत झाल्याने तसेच महिला प्रतिनिधी यांना मागील ७ वर्षात झालेल्या त्रास या मुळे जिल्ह्य़ातील सामान्य गुंतवणूक दार महाराष्ट्र शासनाच्या आणि शासकीय अधिकारी यांच्या ढिसाळपणा व दिरंगाई मुळे झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शांततेच्या मार्गाने शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. या निषेध मोर्चाचे नियोजन काल ३ फेब्रुवारीला, मालवण राजकोट येथील शासकीय विश्रामगृहाजवळ जमलेल्या मैत्रेय गुंतवणूकदार आणि प्रतिनिधी यांच्या छोटेखानी सभेत एकमताने मांडले. तसेच याबाबतीतले पुढील सभा वेगवेगळ्या तालुक्यात आयोजित केल्या जाणार आहेत. सर्वानुमते एक दिवस ठरवून जिल्हा पोलीस कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात भव्य मोर्चा निघणार असल्याची माहिती मालवणचे गुंतवणूकदार जहीर शेख, मिलिंद झाड, शेखर कोचरेकर, लवू केळुस्कर, गया ढोके, अजिंक्य आस्वलकर, गणपत केळुसकर, श्रद्धा वेंगुर्लेकर, सानिका तुळसकर, काजल तोडणकर तसेच अन्य उपस्थित २० गुंतवणूक दार यांनी मालवण येथे दिली आहे तसेच जास्तीत जास्त गुंतवणूक दार यांनी या मोर्चात सहभागी व्हावे यासाठी आवाहन देखील केले आहे.

सिंधुदुर्गातील अंदाजे ३५ हजार गुंतवणूकदार यांचे मैत्रेय कंपनीत ठेवी अडकल्या आहेत. सध्या पूर्ण महाराष्ट्रात्यील लोकांच्या ठेवी लवकरात लवकर मिळाव्या यासाठी ची केस मा. सेशन कोर्ट मुंबई येथे चालू आहे. (Special Case No. 101148/2022) महाराष्ट्र शासनाने मैत्रेय कंपनीचे अंदाजे महाराष्ट्रातील ३५० मालमत्ता जप्त केल्या आहेत व ती विकण्यासाठी त्याचे नोटिफिकेशन बनवले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे व कोर्टाने मालमत्ता विकण्याचे आदेश अद्याप पर्यंत दिले नाहीत. ते आदेश लवकरच दिले जातील यासाठी कोर्टात प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्र शासनाने सन २०१९ च्या नोटिफिकेशन च्या माध्यमातून सामान्य गुंतवणूक दारांना आवाहन केले होते कि, आपल्या पैसे मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या शासकीय विभागांना पत्र व्यवहार न करता आपण आपल्या जिल्ह्यातील मुख्य पोलीस मुख्यालय येथे आपले मैत्रेय पोलिसी बाबत ची सर्व माहिती आर्थिक गुन्हा अन्वेक्षण विभाग यांना अर्जाद्वारे द्यावी. परंतु मधल्या काळात कोरोना आल्याने काही गुंतवणूक दार यांचे जिल्हा प्रशासन कडे अर्ज पोहचले नाहीत, तरी उवरीत सामान्य सामान्य गुंतवणूक दरांचे अर्ज शासनाने स्वीकारून ते मुंबई ला पाठवावे तसेच सदर केस च काम बघणारे मुंबई येथील आर्थिक गुन्हे अन्वेक्षण विभाग येथील शासकीय अधिकारी यांनी कोर्टला सहकार्य करून कोर्टाचे आदेशाचे पालन त्वरित करावे तसेच अजूनपर्यंत ज्या मालमत्ता जप्त केल्या नाहीत त्या जप्त करावेत, मुख्यता महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील जेणेकरून लवकरात लवकर केस चा निर्णय लागेल यासाठी म्हुणुन मैत्रेय गुंतवणूक दार निषेध मोर्चा वेळी निवेदन देणार आहेत.

error: Content is protected !!