युवती सेना जिल्हा विस्तारक रुची राऊत ,तालुका प्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, सन्मेष परब यांच्यासह माजी बांधकाम सभापती यतीन खोत, मंदार केणी, माजी नगरसेवक नितीन वाळके, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, शिवसेना, युवा सेना, युवती सेना व महिला आघाडीचे पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक यशवंत गांवकर उपस्थित.
मालवण | सुयोग पंडित : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्या ४ फेब्रुवारीला होणार्या विशेष दौर्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराला आज ३ फेब्रुवारीला खासदार विनायक राऊत यांनी भेट देत पहाणी केली. खासदार विनायक राऊत यांच्यासोबत युवती सेना जिल्हा विस्तारक रुची राऊत, तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनीही उपस्थित राहून दौर्याच्या तयारीचा आढावा घेतला.
खासदार राऊत यांचे प्रथम मालवणच्या नवीन बंदर जेटी येथे आगमन झाले. तिथून मालवण तालुका व शहर शिवसेना पदाधिकारी यांच्या सोबत नौकेमधून त्यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. छत्रपती शिवराजेश्वर मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होत आहे त्यासंदर्भातील सर्व सोहळ्याच्या आखणीची त्यांनी पहाणी केली. खासदार विनायक राऊत यांनी शिवराजेश्वर मंदिरातील पुजारी व मानकरी यांचीही विचारपुस केली व मंदिरातील धार्मिक विधी व अन्य घटकांची विशेष विचारपुस केली.
खासदार विनायक राऊत व सोबतच्ता सर्व शिवसेना पदाधिकार्यांनी पुन्हा बंदर जेटी येथे येत शासकीय विश्रामगृहात जाऊन तिथल्या सोयींचा आढावा घेतला. यावेळी खासदार विनायक राऊत व युवती सेना जिल्हा विस्तारक रुची राऊत यांच्थासोबत तालुका प्रमुख हरी खोबरेकर, सन्मेष परब, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, ज्येष्ठ शिवसैनिक यशवंत गांवकर, युवती सेनेच्या निनाक्षी शिंदे, महिला आघाडीच्या दीपा शिंदे, युवा सेना प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत व युवती सेना जिल्हा विस्तारक रुची राऊत काय मनोगत व्यक्त केली ते पाहू.