25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवणात ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे भव्य आयोजन ; मार्गदर्शनपर कार्यशाळासुद्धा मेळाव्यात विशेष सामिल असल्याची कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांची माहिती.

- Advertisement -
- Advertisement -

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, ग्राहक न्यायालयाचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र पैलवान आणि पद्मश्री परशुराम गंगावणे असे दिग्गज रहाणार उपस्थित.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी मालवणमधील कोळंब येथे ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली आहे. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांचा जिल्हास्तरीय भव्य मेळावा व मार्गदर्शन कार्यशाळा रविवार ४ फेब्रुवारीला मालवणजवळील कोळंबच्या समर्थ मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्राहक न्यायालयाचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र पैलवान तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री परशुराम गंगावणे, एम.एस.ई.बी.मेडिक्लेम विभाग प्रमुख डॉ. अमोल धर्मजिज्ञासू, मालवण तहसीलदार वर्षा झालटे – भोसले, देवगड तहसीलदार आर.जे.पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर, महाराष्ट्र राज्य निरिक्षक घन:श्याम सांडीम, राज्य सचिव राकेश शिंदे, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंदार काणे असे दिग्खज मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सर्व तालुक्यांचे तसेच जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी या जिल्हास्तरीय भव्य मेळावा व मार्गदर्शन कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेत स्वयंसेवीपणे योगदान देण्यास इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंदार काणे किंवा कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्याशी संपर्क साधून उपस्थित रहावे असेही आवाहन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक ( संपर्क: ९४०५२८८१८८ /९१४६२८८१८) यांनी केले आहे

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, ग्राहक न्यायालयाचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र पैलवान आणि पद्मश्री परशुराम गंगावणे असे दिग्गज रहाणार उपस्थित.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी मालवणमधील कोळंब येथे ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली आहे. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांचा जिल्हास्तरीय भव्य मेळावा व मार्गदर्शन कार्यशाळा रविवार ४ फेब्रुवारीला मालवणजवळील कोळंबच्या समर्थ मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्राहक न्यायालयाचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र पैलवान तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री परशुराम गंगावणे, एम.एस.ई.बी.मेडिक्लेम विभाग प्रमुख डॉ. अमोल धर्मजिज्ञासू, मालवण तहसीलदार वर्षा झालटे - भोसले, देवगड तहसीलदार आर.जे.पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर, महाराष्ट्र राज्य निरिक्षक घन:श्याम सांडीम, राज्य सचिव राकेश शिंदे, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंदार काणे असे दिग्खज मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सर्व तालुक्यांचे तसेच जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी या जिल्हास्तरीय भव्य मेळावा व मार्गदर्शन कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेत स्वयंसेवीपणे योगदान देण्यास इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंदार काणे किंवा कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्याशी संपर्क साधून उपस्थित रहावे असेही आवाहन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक ( संपर्क: ९४०५२८८१८८ /९१४६२८८१८) यांनी केले आहे

error: Content is protected !!