26.7 C
Mālvan
Wednesday, December 18, 2024
IMG-20240531-WA0007

कणकवली नगरपंचायतचा दिवाळी बाजार ठरतोय अनेकांना आधार;भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ..

- Advertisement -
- Advertisement -

नवनवीन उपक्रम व विकासात्मक कामांची माॅनिटर तथा अग्रेसर कणकवली नगरपंचायत असल्याचे माजी खासदार निलेश राणे यांचे प्रशंसोद्गार…..!

कणकवली | उमेश परब : कणकवली नगरपंचायत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. नगरपंचायतीच्या कामाबद्दल नेहमीच आमची कौतुकाची भावना असते. मी या नगरपालिकेचा एक प्रशंसक आहे. नावीन्यता ही कणकवली नगरपंचायतची एक आता सवय बनली आहे. व या युनिव्हर्सिटीचा मी एक विद्यार्थी आहे. अशा शब्दात माजी खासदार भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी कणकवली नगरपंचायत च्या कामाचे व नाविन्यपूर्ण उपक्रमा बद्दल गौरवोद्गार काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत कणकवली नगरपंचायत पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. असेही कौतुकोद्गार राणे यांनी काढले.
कणकवली नगरपंचायत व युथ वेल्फेअर असोसिएशन च्या माध्यमातून कणकवलीतील पेट्रोल पंपासमोर फ्लाय ओव्हर ब्रिज खालील आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बाजार चा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी राणे बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोरोना काळात मंदावलेली बाजारपेठ व त्यानंतर आता हळूहळू स्थानिक व्यवसायिकांना उत्पादकांना त्यांच्या वस्तूंसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही साधी गोष्ट नाही. यानिमित्ताने का होईना आता येथील स्थानिक विक्रेत्यांसाठी नगरपंचायतीने बाजारपेठ उपलब्ध करून दिली. यापुढे या करिता आम्ही देखील प्रयत्न करू अशी ग्वाही राणे यांनी याप्रसंगी दिली. युथ वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष तेजस घाडीगावकर म्हणाले, जिल्ह्यातील स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नगरपंचायत च्या माध्यमातून हा एक छोटासा प्रयत्न केला. हा प्रयत्न जर यशस्वी झाला तर येत्या काळात यापुढील भागातही स्थानिक उत्पादकांना जागा उपलब्ध होण्यासाठी आमची मागणी असणार आहे. यापुढेही तुम्ही स्थानिक उत्पादक व युथ वेल्फेअर असोसिएशन च्या पाठीशी उभे राहील अशी आशा व्यक्त करतो असे प्रतिपादन घाडीगावकर यांनी केले. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते या दिवाळी बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राणे यांनी संपूर्ण दिवाळी बाजाराच्या ठिकाणी असलेल्या घरगुती उत्पादित वस्तूंची पाहणी देखील केली. तसेच कुंभार बांधवांकडून करण्यात येणाऱ्या माती कलेच्या वस्तू प्रत्यक्ष करताना अनुभव देखील घेतला. या बाजारात सहभागी झालेल्या विक्रेत्यांचे ही राणे यांनी कौतुक केले. या दिवाळीत बाजारात बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या फराळाच्या वस्तू, दिवाळी साठी लावण्यात येणाऱ्या मातीच्या पणत्या, मातीचे कुंभार बांधवांनी बनवलेले आकर्षक आकाश कंदील, व अन्य अनेक घरगुती बनविलेल्या वस्तूंचा समावेश आहे. याप्रसंगी जि प अध्यक्ष संजना सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, सभापती मनोज रावराणे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा नेते विशाल परब, मुख्याधिकारी अवधूत तावडे, गटनेते संजय कामतेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, नगरसेवक अभिजित मुसळे, बांधकाम सभापती विराज भोसले, नगरसेविका कविता राणे, मेघा सावंत, माननीय मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, उर्वी जाधव, संजीवनी पवार, तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, नगरसेवक शिशिर परुळेकर, रवींद्र गायकवाड, शहराध्यक्ष आण्णा कोडदे, बाबू वळंजू, शहराध्यक्ष प्राची कर्पे, संजना सदडेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, बंडू गांगण, महेश सावंत, गीतांजली कामत, राजश्री धुमाळे, युथ वेल्फेअर चे अध्यक्ष तेजस घाडीगांवकर, सचिव रुपेश घाडी, सहसचिव राउफ काझी, विवेक ताम्हणकर, बाबू वळंजू, अनिकेत घाडीगांवकर, संकेत घाडीगांवकर, पंडित परब, विराज तावडे, समृद्धी घाडिगावकर, कोमल काझी, रोहित सोलकर, सुजित तांबे, आदी उपस्थित होते. या दिवाळीत बाजारात दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत हिरकणी लोकसंचालित साधन केंद्र, बचत गटाच्या महिलांनी देखील या बाजारात सहभाग घेतला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नवनवीन उपक्रम व विकासात्मक कामांची माॅनिटर तथा अग्रेसर कणकवली नगरपंचायत असल्याचे माजी खासदार निलेश राणे यांचे प्रशंसोद्गार.....!

error: Content is protected !!