मसुरे | सौ प्राजक्ता पेडणेकर : भारतीय राष्ट्रीय स्थलांतरित कामगार संघटना (आय एन एम डब्ल्यू यु) च्या राष्ट्रीय सचिव पदी मसुरे गावचे सुपुत्र, युवा समाजसेवक आशिष विजयसिंह(बापूसाहेब ) प्रभुगांवकर यांची निवड करण्यात आलेली आहे. आशिष प्रभुगावकर यांची सामाजिक संघटनात्मक उपक्रमा मधील विस्तृत आणि वैविध्यपूर्ण अनुभवाचा विचार करून भारतीय राष्ट्रीय स्थलांतरित कामगार युनियन च्या राष्ट्रीय राज्य आणि जिल्हास्तरीय युनिट्स मजबूत करण्यासाठी ही निवड करण्यात आल्याचे अमजद हसन राष्ट्रीय सरचिटणीस (आय एन एम डब्ल्य यू) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आशिष प्रभुगावकर हे माजी राज्यमंत्री कै. बापूसाहेब प्रभुगावकर यांचे सुपुत्र असून आशिष यानी आज पर्यंत राज्य देश पातळीवर विविध सामाजिक सेवा, विविध कामगारांचे प्रश्न, विविध विकासात्मक प्रश्न, प्राधान्याने सोडविले आहे. सामाजिक, कला-क्रीडा यामध्येही आशिष यांचे योगदान खूप मोठे आहे. यावेळी बोलताना आशिष प्रभुगावकर म्हणाले आय एन एम डब्ल्यू यु या युनियन च्या माध्यमातून अतिशय नियोजनबद्ध काम करून ही संघटना जास्तीत जास्त वाढविण्यासाठी माझ्या पदाचा मी उपयोग करेन. आशिष प्रभुगावकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.आशिष प्रभुगावकर हे माजी जिप अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर यांचे बंधू आहेत.