IMG-20240531-WA0007

सिंधुदुर्गच्या सुपुत्र चित्र कलावंताला व्हेनीस आंतरराष्ट्रीय वाॅटर कलर फेस्टीवलमध्ये पुरस्कार…!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले चित्र कलावंत आशीष इरप यांच्या ‘वेट वाईब्ज’ या चित्र कलाकृतीला इटलीतील वेनीस आंतरराष्ट्रीय वाॅटर कलर फेस्टीवलमध्ये मानाचा ‘एक्सलन्स पुरस्कार सन्मान’ प्राप्त झाला आहे. त्यांना या वेनीस आंतरराष्ट्रीय वाॅटर कलर फेस्टीवलमध्ये विशेष निमंत्रण देऊन गौरविण्यात आले. आशीष इरप हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा पिरावाडी येथील आहेत.

व्हेनीस वाॅटर कलर फेस्टीवलमध्ये यंदा जगभरातून जवळपास १२०० पेक्षा जास्त कलाकृतींमध्ये चढाओढ होती. लॅन्डस्केप निसर्गचित्र प्रकारात आशिष इरप यांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील प्रवासी वातावरणाचे चित्र साकारले. त्यांना पुरस्कार देताना त्यांनी साकारलेली मनमोहक रंगसंगती, प्रकाश योजना व वाॅटर कलर मधील त्यांचे प्राविण्य यांचा विशेष उल्लेख करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले चित्र कलावंत आशीष इरप यांच्या 'वेट वाईब्ज' या चित्र कलाकृतीला इटलीतील वेनीस आंतरराष्ट्रीय वाॅटर कलर फेस्टीवलमध्ये मानाचा 'एक्सलन्स पुरस्कार सन्मान' प्राप्त झाला आहे. त्यांना या वेनीस आंतरराष्ट्रीय वाॅटर कलर फेस्टीवलमध्ये विशेष निमंत्रण देऊन गौरविण्यात आले. आशीष इरप हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा पिरावाडी येथील आहेत.

व्हेनीस वाॅटर कलर फेस्टीवलमध्ये यंदा जगभरातून जवळपास १२०० पेक्षा जास्त कलाकृतींमध्ये चढाओढ होती. लॅन्डस्केप निसर्गचित्र प्रकारात आशिष इरप यांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील प्रवासी वातावरणाचे चित्र साकारले. त्यांना पुरस्कार देताना त्यांनी साकारलेली मनमोहक रंगसंगती, प्रकाश योजना व वाॅटर कलर मधील त्यांचे प्राविण्य यांचा विशेष उल्लेख करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!