मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन’ यांच्या वतीने कोकण रेल्वे कार्पोरेशनचे चेअरमन श्री. संजय गुप्ता यांचे झाले स्वागत करण्यात आले. कणकवली रेल्वे स्टेशन संदर्भात निवेदन देण्यात आले.
संघटनेच्या वतीने कणकवली रेल्वे स्टेशन संदर्भात, रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर २ च्या पलिकडे सर्विस रोड मंजूर करण्यात यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वे स्टेशन हे सतत वर्दळ असलेले अतिशय महत्त्वाचे मध्यवर्ती रेल्वे स्टेशन आहे. येथे मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांची ये-जा चालू असते. यामध्ये अपंग व्यक्ती ,गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना प्लॅटफॉर्म नंबर २ वरून प्लॅटफॉर्म नंबर १ वर येण्यासाठी जिना चढून सामान वाहून नेणे फारचं जिकरीचे होते. तरी प्रवाशांच्या सोयीसाठी कणकवली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर २ च्या पलीकडे लवकरात लवकर सर्विस रोड मंजूर करण्यात यावा. कणकवली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर १ ला संपूर्ण प्रवासी शेड मंजूर करण्यात यावी. संपूर्ण प्रवासी शेड नसल्यामुळे ऊन, वारा, पाऊस यापासून प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्त रेल्वे प्रवासी संख्या ही कणकवली रेल्वे स्टेशनला आहे. प्रवासी संख्या लक्षात घेता कणकवली येथे नेत्रावती एक्सप्रेस या रेल्वे गाडीला थांबा देण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन कोकण रेल्वे कार्पोरेशन चे चेअरमन संजय गुप्ता यांना देण्यात आले. सकारात्मक चर्चा झाली. त्यावेळी उपस्थित ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री. संतोष नाईक, रत्नागिरी जिल्हा सचिव श्री. विकास पेजे, कणकवली तालुका कार्याध्यक्ष श्री. हनीफ भाई पीरख़ान, तालुकाध्यक्ष सौ. सौ संजना सदडेकर, उपाध्यक्ष श्री.सदाशिव राणे, संघटक तथा स्पेक्टो मार्टचे मालक श्री. मंगेश चव्हाण, सदस्य भरत तळवडेकर कोकण रेल्वे कार्पोरेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.