27 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आचरा गांवच्या बहुप्रतिक्षित ग्रामसभेला ग्रामपंचायत सभागृह ‘हाऊसफुल्ल’.!’

- Advertisement -
- Advertisement -

सरपंच जेराॅन फर्नांडिस व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती ; देवस्थान समिती ट्रस्टचे विश्वस्तअनुपस्थित.

माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर, जगदीश पांगे, ख. वि. संघाचे अध्यक्ष राजन गांवकर, अनिल करंजे यांच्यासह अनेक माजी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ व युवा ग्रामस्थ, महिला यांचा चर्चा व ठरावांमध्ये सक्रीय सहभाग.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथील २२ डिसेंबर २०२३ ला आयोजीत केलेल्या ग्रामसभेकडे अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागलेले होते. आचरा ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक गेल्या महिन्यात संपन्न झाल्यानंतर पहिल्यांदाच या मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. आचरा निवडणूक दरम्यान आचरा ग्रामविकास आघाडी व श्री देव रामेश्वर पॅनेल या दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्ध्यांकडून अनेक ‘जिव्हाळ्याच्या मुद्द्यांबाबत’ निवडणुकी नंतर काम केले जाईल अशी ग्रामस्थ तथा मतदारांना शाश्वती देण्यात आली होती त्यामुळे काल २२ डिसेंबरच्या ग्रामसभेला आचरा वासियांची लक्षणीय उपस्थिती होती.

आचरा सरपंच व ग्राम सभेचे अध्यक्ष जेराॅन फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक प्रकाश कदम.

आचरा ग्रामपंचायतच्या श्री देव रामेश्वर सभागृहात सकाळी ११:३० वाजता ग्रामसेवक प्रकाश कदम यांनी ग्रामसभेला उपस्थित सर्वांचे स्वागत करून सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे संचलन सुरु केले. त्यानंतर नवनिर्वाचित सरपंच जेराॅन फर्नांडिस व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष मिराशी, सौ. किशोरी आचरेकर, सौ. श्रृती सावंत, सौ. सायली सारंग, सौ. पूर्वा तारी, सौ. अनुष्का गांवकर, सौ. सारीका तांडेल, श्री. मुजफ्फर मुजावर, श्री. चंद्रकांत कदम, श्री. योगेश गांवकर, श्री. महेंद्र घाडी, श्री. पंकज आचरेकर यांनी त्यांची ओळख ग्रामस्थांना करुन दिली.
ग्रामसेवक प्रकाश कदम यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले व त्यानुसार झालेल्या ठरावांच्या कार्यवाहिची माहिती दिली. जि प व इतर वरीष्ठ कार्यालयांमधून आलेल्या सूचना व नविन आदेशांची माहिती ग्रामसभेसमोर ठेवण्यात आली. सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी ग्रामसभेतील निर्णय हे ग्रामस्थ लोकच सक्षमपणे घेतील व तो त्यांचा हक्क असल्याचे सुरवातीलाच स्पष्ट केले. या नंतर विविध समस्या तसेच मागण्यांसाठी आलेल्या ग्रामस्थांच्या अर्जांचे वाचन झाले व त्यावर चर्चा झाली. यानंतर ग्रामविकासासाठी मंजूर झालेल्या व कार्यरत असलेल्या शासकीय योजनांच्या अमलबजावणी साठी विविध समित्यांची सर्वांच्या चर्चेतून व ठराव अनुमोदन यातून स्थापना करण्यात आली ज्यात प्रामुख्याने जल नल योजना, कचरा व्यवस्थापन समिती यांचा समावेश आहे. विविध प्रभागांतील रस्ते, अनुदानित शौचालये, शोषखड्डे याबाबत चर्चा व अर्ज यांच्या कार्यवाहीबाबत चर्चा झाली व प्रस्तावित कामांची माहिती देण्यात आली. प्राथमीक आरोग्य केंद्रातिल सोयी सुविधांबाबत व तक्रारींबाबत कर्मचारी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांच्यात चर्चा झाली व सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी आरोग्य केंद्रातील रुग्णसेवेमध्ये हयगय न करायच्या स्पष्ट सूचना दिल्या. नियम व शिष्टाचाराप्रमाणे विविध स्थापित समित्यांचे काम सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली कार्यान्वीत होईल असे ग्रामसेवक प्रकाश कदम यांनी स्पष्ट केले.

माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर

या सभेसाठी ‘इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे या ट्रस्टमध्ये इच्छुक ग्रामस्थांना कायमस्वरुपी सभासदत्व मिळणे देवस्थान समितीच्या जाचक व भावनिक अटींबाबतच्या सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर जवळपास २ तास चर्चा झाली. या ग्रामसभेला देवस्थान समिती ट्रस्टचे विश्वस्त अनुपस्थित होते. ट्रस्ट द्वारा ग्रामपंचायतला त्यांच्यावरील आरोपांचे एका पत्राद्वारे उत्तर पाठवण्यात आले होते ज्याचे जाहीर वाचन ग्रामसेवक प्रकाश कदम यांनी ग्रामसभेसमोर केले. देवस्थान समिती ट्रस्टने त्यांच्यावरील आरोप हे केवळ १११ ग्रामस्थांनी केले आहेत व ट्रस्टचा कारभार पारदर्शक आहे असे सांगत त्यांच्याबद्दलची तक्रार ही ग्रामसभेत मांडण्यायोग्य नसल्याचे पत्राद्वारे सांगितले. ट्रस्टवरील आरोप हे राजकीय पार्श्वभूमीचे असल्याचे सांगत देवस्थान समिती ट्रस्टने १९५३ पासून आचरा वासियांच्या सार्वजनिक ह सुखसोयींसाठी निंस्वार्थपणे जमीन देणे व इतर सामाजिक कामे केल्याचे पत्रात नमूद केले. तसेच श्री देव रामेश्वर यांचा कौल घेऊनच सभासदत्व व ट्रस्टचा कारभार चालतो त्यामुळे श्री देव रामेश्वर यांच्यावर विश्वास नसणारे ग्रामस्थच देवस्थान समिती ट्रस्टच्या विरुद्ध तक्रार करत असल्याचाही देवस्थान समिती ट्रस्टने युक्तिवाद मांडला. या युक्तिवादाचा माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर यांनी जोरदार निषेध केला व खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर यांनीही या लढ्याबाबत गेल्या ३५ वर्षांतील विविध घडामोडींवर प्रकाश टाकला. यानंतर जगदीश पांगे तसेच अनिल करंजे यांनी ग्रामपंचायत सदस्य व देवस्थान समितीचे काही माजी विश्वस्त यांच्याशी संवाद साधला.

ग्रामस्थांनी देवस्थान समिती ट्रस्टचा कारभार हा कायद्याने चालावा त्याला भावनिक गुंतवणुकीत चालवू नये अशी मागणी केली अखेर उपस्थित ग्रामस्थ, सरपंच जेराॅन फर्नांडिस व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी मिळून देवस्थान समिती ट्रस्टच्या जाचक अटींविरुद्ध सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार करायचा एकमुखी ठराव निर्णय घेतला. देवस्थान समिती ट्रस्टमधील बारा पाच मानकरी यांच्या योग्य संख्येतील सहभागाबाबतही चर्चा झाली. या मुद्द्यावर समस्त आचरा वासियांची एकवाक्यता दिसून आली व याबद्दल माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर यांनी ग्रामस्थ व सरपंच तथा सभेचे अध्यक्ष तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांची प्रशंसा केली.

शिक्षण विषयक मुद्दे व काही नवीन मुद्द्यांबाबतही ठराव करण्यात आले आणि पर्यटन व रोजगार विषयक प्रणालीसाठी लवकरच नवीन आराखडा तयार करण्यात येईल अशी माहिती सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी दिली. ग्रामसभा प्रसन्नपणे संपन्न झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

ग्रामसेवक प्रकाश कदम यांनी उपस्थित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी लोकप्रतिनिधी, मान्यवर व सर्वांचे आभार मानले व ग्रामसभेची सांगता झाल्याचे जाहीर केले

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सरपंच जेराॅन फर्नांडिस व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती ; देवस्थान समिती ट्रस्टचे विश्वस्तअनुपस्थित.

माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर, जगदीश पांगे, ख. वि. संघाचे अध्यक्ष राजन गांवकर, अनिल करंजे यांच्यासह अनेक माजी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ व युवा ग्रामस्थ, महिला यांचा चर्चा व ठरावांमध्ये सक्रीय सहभाग.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथील २२ डिसेंबर २०२३ ला आयोजीत केलेल्या ग्रामसभेकडे अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागलेले होते. आचरा ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक गेल्या महिन्यात संपन्न झाल्यानंतर पहिल्यांदाच या मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. आचरा निवडणूक दरम्यान आचरा ग्रामविकास आघाडी व श्री देव रामेश्वर पॅनेल या दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्ध्यांकडून अनेक 'जिव्हाळ्याच्या मुद्द्यांबाबत' निवडणुकी नंतर काम केले जाईल अशी ग्रामस्थ तथा मतदारांना शाश्वती देण्यात आली होती त्यामुळे काल २२ डिसेंबरच्या ग्रामसभेला आचरा वासियांची लक्षणीय उपस्थिती होती.

आचरा सरपंच व ग्राम सभेचे अध्यक्ष जेराॅन फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक प्रकाश कदम.

आचरा ग्रामपंचायतच्या श्री देव रामेश्वर सभागृहात सकाळी ११:३० वाजता ग्रामसेवक प्रकाश कदम यांनी ग्रामसभेला उपस्थित सर्वांचे स्वागत करून सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे संचलन सुरु केले. त्यानंतर नवनिर्वाचित सरपंच जेराॅन फर्नांडिस व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष मिराशी, सौ. किशोरी आचरेकर, सौ. श्रृती सावंत, सौ. सायली सारंग, सौ. पूर्वा तारी, सौ. अनुष्का गांवकर, सौ. सारीका तांडेल, श्री. मुजफ्फर मुजावर, श्री. चंद्रकांत कदम, श्री. योगेश गांवकर, श्री. महेंद्र घाडी, श्री. पंकज आचरेकर यांनी त्यांची ओळख ग्रामस्थांना करुन दिली.
ग्रामसेवक प्रकाश कदम यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले व त्यानुसार झालेल्या ठरावांच्या कार्यवाहिची माहिती दिली. जि प व इतर वरीष्ठ कार्यालयांमधून आलेल्या सूचना व नविन आदेशांची माहिती ग्रामसभेसमोर ठेवण्यात आली. सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी ग्रामसभेतील निर्णय हे ग्रामस्थ लोकच सक्षमपणे घेतील व तो त्यांचा हक्क असल्याचे सुरवातीलाच स्पष्ट केले. या नंतर विविध समस्या तसेच मागण्यांसाठी आलेल्या ग्रामस्थांच्या अर्जांचे वाचन झाले व त्यावर चर्चा झाली. यानंतर ग्रामविकासासाठी मंजूर झालेल्या व कार्यरत असलेल्या शासकीय योजनांच्या अमलबजावणी साठी विविध समित्यांची सर्वांच्या चर्चेतून व ठराव अनुमोदन यातून स्थापना करण्यात आली ज्यात प्रामुख्याने जल नल योजना, कचरा व्यवस्थापन समिती यांचा समावेश आहे. विविध प्रभागांतील रस्ते, अनुदानित शौचालये, शोषखड्डे याबाबत चर्चा व अर्ज यांच्या कार्यवाहीबाबत चर्चा झाली व प्रस्तावित कामांची माहिती देण्यात आली. प्राथमीक आरोग्य केंद्रातिल सोयी सुविधांबाबत व तक्रारींबाबत कर्मचारी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांच्यात चर्चा झाली व सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी आरोग्य केंद्रातील रुग्णसेवेमध्ये हयगय न करायच्या स्पष्ट सूचना दिल्या. नियम व शिष्टाचाराप्रमाणे विविध स्थापित समित्यांचे काम सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली कार्यान्वीत होईल असे ग्रामसेवक प्रकाश कदम यांनी स्पष्ट केले.

माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर

या सभेसाठी 'इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे या ट्रस्टमध्ये इच्छुक ग्रामस्थांना कायमस्वरुपी सभासदत्व मिळणे देवस्थान समितीच्या जाचक व भावनिक अटींबाबतच्या सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर जवळपास २ तास चर्चा झाली. या ग्रामसभेला देवस्थान समिती ट्रस्टचे विश्वस्त अनुपस्थित होते. ट्रस्ट द्वारा ग्रामपंचायतला त्यांच्यावरील आरोपांचे एका पत्राद्वारे उत्तर पाठवण्यात आले होते ज्याचे जाहीर वाचन ग्रामसेवक प्रकाश कदम यांनी ग्रामसभेसमोर केले. देवस्थान समिती ट्रस्टने त्यांच्यावरील आरोप हे केवळ १११ ग्रामस्थांनी केले आहेत व ट्रस्टचा कारभार पारदर्शक आहे असे सांगत त्यांच्याबद्दलची तक्रार ही ग्रामसभेत मांडण्यायोग्य नसल्याचे पत्राद्वारे सांगितले. ट्रस्टवरील आरोप हे राजकीय पार्श्वभूमीचे असल्याचे सांगत देवस्थान समिती ट्रस्टने १९५३ पासून आचरा वासियांच्या सार्वजनिक ह सुखसोयींसाठी निंस्वार्थपणे जमीन देणे व इतर सामाजिक कामे केल्याचे पत्रात नमूद केले. तसेच श्री देव रामेश्वर यांचा कौल घेऊनच सभासदत्व व ट्रस्टचा कारभार चालतो त्यामुळे श्री देव रामेश्वर यांच्यावर विश्वास नसणारे ग्रामस्थच देवस्थान समिती ट्रस्टच्या विरुद्ध तक्रार करत असल्याचाही देवस्थान समिती ट्रस्टने युक्तिवाद मांडला. या युक्तिवादाचा माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर यांनी जोरदार निषेध केला व खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर यांनीही या लढ्याबाबत गेल्या ३५ वर्षांतील विविध घडामोडींवर प्रकाश टाकला. यानंतर जगदीश पांगे तसेच अनिल करंजे यांनी ग्रामपंचायत सदस्य व देवस्थान समितीचे काही माजी विश्वस्त यांच्याशी संवाद साधला.

ग्रामस्थांनी देवस्थान समिती ट्रस्टचा कारभार हा कायद्याने चालावा त्याला भावनिक गुंतवणुकीत चालवू नये अशी मागणी केली अखेर उपस्थित ग्रामस्थ, सरपंच जेराॅन फर्नांडिस व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी मिळून देवस्थान समिती ट्रस्टच्या जाचक अटींविरुद्ध सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार करायचा एकमुखी ठराव निर्णय घेतला. देवस्थान समिती ट्रस्टमधील बारा पाच मानकरी यांच्या योग्य संख्येतील सहभागाबाबतही चर्चा झाली. या मुद्द्यावर समस्त आचरा वासियांची एकवाक्यता दिसून आली व याबद्दल माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर यांनी ग्रामस्थ व सरपंच तथा सभेचे अध्यक्ष तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांची प्रशंसा केली.

शिक्षण विषयक मुद्दे व काही नवीन मुद्द्यांबाबतही ठराव करण्यात आले आणि पर्यटन व रोजगार विषयक प्रणालीसाठी लवकरच नवीन आराखडा तयार करण्यात येईल अशी माहिती सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी दिली. ग्रामसभा प्रसन्नपणे संपन्न झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

ग्रामसेवक प्रकाश कदम यांनी उपस्थित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी लोकप्रतिनिधी, मान्यवर व सर्वांचे आभार मानले व ग्रामसभेची सांगता झाल्याचे जाहीर केले

error: Content is protected !!