संतोष साळसकर | सहसंपादक : ५१ व्या देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गवाणे पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिर या प्रशालेने प्राथमिक गटात सादर केलेल्या ‘विजे विना पंप’ या वैज्ञानिक प्रतिकृतीस तथा माॅडेलला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. हे माॅडेल प्रशंसनीय ठरले.
श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, पडेल येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात विक्रांत आयरे व पुष्कर नादकर या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विजेविना पंप या वैज्ञानिक प्रतिकृतीस माध्यमिक विद्यामंदिर गवाणे या प्रशालेला प्रथम क्रमांक मिळाला असून या प्रतिकृतीची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. या विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक श्री. रुणकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल संस्थाध्यक्ष अशोक तळेकर व संस्था पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक विश्वास प्रभुदेसाई , शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच माजी विद्यार्थी संघाच्यावतीने अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.