24 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

आरे फाटा येथे ३० डिसेंबर रोजी गुरुदासवारी आनंद सोहळ्याचे ; कोकण कला भूषणभजन सम्राट बुवा चंद्रकांत कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | सहसंपादक : गुरुदास शिष्य परिवाराच्या वतीने कोकण कला भूषण, सुप्रसिध्द भजनकार भजन सम्राट बुवा चंद्रकांत काशीराम कदम ( गुरुदास) यांच्या १९ व्या स्मृतिदिना निमित्त देवगड तालुक्यातील आरे फाटा येथील गुरुदास चौक येथे शनिवार ३० डिसेंबरला गुरुदासमय आनंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता आरे फाटा गुरुदास चौक येथील स्मारकाजवळ गणेश पुजन, मान्यवराच्या हस्ते दीप प्रज्वलन व उपस्थित मान्यवर, भजनी कलावंताचा चक्री भजनांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता गुरुदास पालखी सोहळा आणि दिंडी भजन, दुपारी १ वाजता मान्यवराचे आभार प्रदर्शन आणि महाप्रसादानंतर गुरुदासवारी आनंद सोहळ्याची सांगता होणार आहे.

हा कार्यक्रम आरे आणि वळिवंडे ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रेष्ठ भजनी कलावंत, मान्यवर आणि तमाम भजन रसिकांनी सहकुटुंब या गुरुदासवारीत सहभागी व्हावे. असे गुरुदास शिष्य परिवाराचे अध्यक्ष लक्ष्मण गुरव, उपाध्यक्ष भगवान लोकरे, सेक्रेटरी रवींद्र लाड व गुरुदास शिष्य परिवार यांनी आवाहन केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | सहसंपादक : गुरुदास शिष्य परिवाराच्या वतीने कोकण कला भूषण, सुप्रसिध्द भजनकार भजन सम्राट बुवा चंद्रकांत काशीराम कदम ( गुरुदास) यांच्या १९ व्या स्मृतिदिना निमित्त देवगड तालुक्यातील आरे फाटा येथील गुरुदास चौक येथे शनिवार ३० डिसेंबरला गुरुदासमय आनंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता आरे फाटा गुरुदास चौक येथील स्मारकाजवळ गणेश पुजन, मान्यवराच्या हस्ते दीप प्रज्वलन व उपस्थित मान्यवर, भजनी कलावंताचा चक्री भजनांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता गुरुदास पालखी सोहळा आणि दिंडी भजन, दुपारी १ वाजता मान्यवराचे आभार प्रदर्शन आणि महाप्रसादानंतर गुरुदासवारी आनंद सोहळ्याची सांगता होणार आहे.

हा कार्यक्रम आरे आणि वळिवंडे ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रेष्ठ भजनी कलावंत, मान्यवर आणि तमाम भजन रसिकांनी सहकुटुंब या गुरुदासवारीत सहभागी व्हावे. असे गुरुदास शिष्य परिवाराचे अध्यक्ष लक्ष्मण गुरव, उपाध्यक्ष भगवान लोकरे, सेक्रेटरी रवींद्र लाड व गुरुदास शिष्य परिवार यांनी आवाहन केले आहे.

error: Content is protected !!