26 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकरांनी डाग़ल्या केंद्र व राज्य सरकारांवर आरोपांच्या शब्द तोफ़ा…!

- Advertisement -
- Advertisement -

१५०० लोकांचे कोरोनाचे बळी गेलेत?;लोकप्रतिनिधींना जाब जनतेने विचारला पाहिजे…

कणकवली | उमेश परब : जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना जाब विचारण्याची गरज आहे.जनतेला दिलेली आश्वासने खोटी ठरली आहेत.केंद्रात आलेल्या सत्ताधाऱ्यांनी “अच्छे दिन लायेंगे” महागाई कम करेंगे ..अशी घोषणा देत सत्तेवर आले.त्याउलट पेट्रोल,डिझेल व गॅसची प्रचंड प्रमाणात महागाई केली आहे.महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित कोडमडले आहे.त्याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे.त्यामुळेच आपण निवडणुकीत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना जनतेने जाब विचारला पाहिजे.केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी लोकांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्राने गेल्या सात वर्षात नोटबंदी व अन्य केलेल्या उपाययोजना असफल ठरल्या आहेत.त्याचे परिणाम आता सुरु झाले असून सर्वसामान्य जनता होरपली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विदर्भ, मराठवाडा प्रमाणे आत्महत्या ट्रेंड सुरु झाला आहे.त्याचा विचार जिल्ह्यातील सत्ताधारी लोकांनी केला पाहिजे.आहे.जिल्ह्यातील १५०० लोकांचे प्राण कोविड मुळे गेलेत. त्याला सत्ताधारी जबाबदार आहेत.शासनाकडे पैसे नसताना मोठमोठ्या घोषणा करतात.त्यामुळेच शिवसेना व कॉग्रेस लोक आंदोलनाची भाषा करताहेत,असा टोला परशुराम उपरकर यांनी केला. सध्या राज्यात वानखेडे प्रकरण किंवा अन्य घटना घडवून जनतेचे लक्ष विचलित करुन महागाई व विकासापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.शेती नुकसान व तोक्ते वादळाची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही.जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी सत्ताधारी अपयशी ठरले आहेत.कुडाळ महिला रुग्णालयात गेली ७ वर्षे रखडले आहे.मेडिकल कॉलेज लॉलीपॉप दाखवून मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल दाबण्याचा पर्यंत केला आहे.जनतेने निवडणूक आलेल्या लोकप्रतिनिधींना दारावर आल्यावर जाब विचारला पाहिजे.७ वर्षातील घोषणा व झालेली विकासकामे पाहता विकास झालाच नाही.केवळ घोषणा ठरल्या आहेत,असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

१५०० लोकांचे कोरोनाचे बळी गेलेत?;लोकप्रतिनिधींना जाब जनतेने विचारला पाहिजे…

कणकवली | उमेश परब : जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना जाब विचारण्याची गरज आहे.जनतेला दिलेली आश्वासने खोटी ठरली आहेत.केंद्रात आलेल्या सत्ताधाऱ्यांनी "अच्छे दिन लायेंगे" महागाई कम करेंगे ..अशी घोषणा देत सत्तेवर आले.त्याउलट पेट्रोल,डिझेल व गॅसची प्रचंड प्रमाणात महागाई केली आहे.महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक गणित कोडमडले आहे.त्याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे.त्यामुळेच आपण निवडणुकीत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना जनतेने जाब विचारला पाहिजे.केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी लोकांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्राने गेल्या सात वर्षात नोटबंदी व अन्य केलेल्या उपाययोजना असफल ठरल्या आहेत.त्याचे परिणाम आता सुरु झाले असून सर्वसामान्य जनता होरपली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विदर्भ, मराठवाडा प्रमाणे आत्महत्या ट्रेंड सुरु झाला आहे.त्याचा विचार जिल्ह्यातील सत्ताधारी लोकांनी केला पाहिजे.आहे.जिल्ह्यातील १५०० लोकांचे प्राण कोविड मुळे गेलेत. त्याला सत्ताधारी जबाबदार आहेत.शासनाकडे पैसे नसताना मोठमोठ्या घोषणा करतात.त्यामुळेच शिवसेना व कॉग्रेस लोक आंदोलनाची भाषा करताहेत,असा टोला परशुराम उपरकर यांनी केला. सध्या राज्यात वानखेडे प्रकरण किंवा अन्य घटना घडवून जनतेचे लक्ष विचलित करुन महागाई व विकासापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.शेती नुकसान व तोक्ते वादळाची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही.जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी सत्ताधारी अपयशी ठरले आहेत.कुडाळ महिला रुग्णालयात गेली ७ वर्षे रखडले आहे.मेडिकल कॉलेज लॉलीपॉप दाखवून मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल दाबण्याचा पर्यंत केला आहे.जनतेने निवडणूक आलेल्या लोकप्रतिनिधींना दारावर आल्यावर जाब विचारला पाहिजे.७ वर्षातील घोषणा व झालेली विकासकामे पाहता विकास झालाच नाही.केवळ घोषणा ठरल्या आहेत,असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.

error: Content is protected !!