25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

स्वतःचा जेसीबी असलेली जिल्ह्यातील पहिली मालवण नगरपरिषद ; आमदार वैभव नाईक यांनी नगरपरिषदला भेट देऊन दिल्या शुभेच्छा..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात स्वच्छता राखण्यासाठी व इतर कामांसाठी मालवण नगर परिषदेने स्वतःचा जेसीबी घेतला असून जेसीबी असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली नगरपरिषद ठरली आहे. त्याचबरोबर नगरपरिषदेच्या सभागृहाचे देखील नूतनीकरण करण्यात आले आहे.आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण नगरपरिषदेत भेट देऊन मुख्याधिकारी संतोष जिरगे व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पुढील वर्षभर नगरपरिषदेच्या निवडणुका होणार नाहीत त्यामुळे प्रशासनाने मालवण शहरातील कामे चांगल्या पद्धतीने करून घ्यावीत. बीच क्लिंनिग मशीन देखील आपल्याकडे आहे. न.प.चे सभागृह देखील चांगले झाले आहे. येत्या काळात मालवणचे भाजी मार्केट, फिश एक्वेरियम ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य आपल्या माध्यमातून केले जाईल अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.

यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,मंदार ओरोसकर, बाबी जोगी, महेश जावकर, किरण वाळके, सेजल परब, संमेश परब यांसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नगरपरिषदेचे कर्मचारीवृंद उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात स्वच्छता राखण्यासाठी व इतर कामांसाठी मालवण नगर परिषदेने स्वतःचा जेसीबी घेतला असून जेसीबी असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली नगरपरिषद ठरली आहे. त्याचबरोबर नगरपरिषदेच्या सभागृहाचे देखील नूतनीकरण करण्यात आले आहे.आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण नगरपरिषदेत भेट देऊन मुख्याधिकारी संतोष जिरगे व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पुढील वर्षभर नगरपरिषदेच्या निवडणुका होणार नाहीत त्यामुळे प्रशासनाने मालवण शहरातील कामे चांगल्या पद्धतीने करून घ्यावीत. बीच क्लिंनिग मशीन देखील आपल्याकडे आहे. न.प.चे सभागृह देखील चांगले झाले आहे. येत्या काळात मालवणचे भाजी मार्केट, फिश एक्वेरियम ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी लागणारे सर्वोतोपरी सहकार्य आपल्या माध्यमातून केले जाईल अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.

यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,मंदार ओरोसकर, बाबी जोगी, महेश जावकर, किरण वाळके, सेजल परब, संमेश परब यांसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नगरपरिषदेचे कर्मचारीवृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!