चित्रपट व नाट्य सृष्टीतील अनेक दिग्गजांची उपस्थिती.
मालवण नगरपरिषदे तर्फे ८ लाख ८० हजाराच्या दिव्यांग निधी धनादेशाचे प्रशासक संतोष जिरगे व मान्यवरांच्या हस्ते झाले वितरण.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातून.आज १६ डिसेंबरला मालवण नगरपरिषदेच्या नूतन सभागृहाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतील असंख्य कलाकार उपस्थित होते. हा शासकीय सोहळा अत्यंत ग्लॅमरस स्वरुपात संपन्न झाला.
सर्वात आधी मालवण नगरपरिषदे तर्फे अत्याधुनिक कचरा व्यवस्थापना हायटेक वाहनाचे यावेळी लोकार्पण व उद्घाटन अभिनेता संतोष पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मालवण नगरपरिषद सभागृहाच्या नूतन फलकाचे अनावरण अभिनेत्री नूतन जयंत व इतरांच्या हस्ते संपन्न झाले.
त्यानंतर मुख्य सभागृहाचे फीत कापून उद्घानट झाले. अभिनेता प्प्ररथमेश परब व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपज्वलनाने मुख्य सोहळ्याला सुरवात झाली. नगरपरिषदे तर्फे निखील नाईक यांनी उप स्थित सर्वांचे स्वागत केले आणि त्यानंतर मुख्याधिकारी व प्रशासक संतोष जिरगे यांनी प्रमुख अतिथी अभिनेते विजय पाटकर यांचे स्वागत केले. यानंतर सुहास परांजपे, हेमलता बाणे, प्रथमेश परब, नूतन जयंत, अभिजीत चव्हाण, आरती सोळंकी, पंढरीनाथ कांबळे, विजय राणे, वेतोबा सेम उमाकांत पाटील, मीरा जोशो, अस्मिता देशभुख, तन्मय पटेकर, संचित चौधरी, आनंदा कारेकर, सुचित जाधव अशा कलावंतांचा नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी सुधाकर पाटकर, सोनाली हळदणकर, निखील नाईक, आनंद म्हापणकर, सौ. कुलकर्णी, श्रीमती करुणा गांवकर व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या सभागृहाच्या इंटिरीअर डेकोरेटर बाबरेकर मॅडम यांचाही विशेष सत्कार संपन्न झाला.
या दरम्यान नगरपरिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी संतोष जिरगे व मान्यवरांच्या हस्ते ८ लाख ८० हजाराच्या दिव्यांग निधी धनादेशाचे वितरण करण्यात आले. दिव्यांग बांधव सत्यम पाटील, दत्ता कामतेकर व उपस्थित दिव्यांग बांधवांना हा धनादेश देण्यात आला.
यानंतर अभिनेते दिगंबर नाईक यांनी विशेष गार्हाणे सादर केले व विजय पाटकर तसेच अभिजीत चव्हाण यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. शेवटी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व हा शासकीय सोहळा इतक्या ग्लॅममरस पद्धतीने शक्य झाला याबद्दल विशेष प्रशंसा केली.
सूत्रसंचालन निखील नाईक यांनी सर्वांचे आभार मानले व शतकपूर्ती केलेल्या मालवण नगरपरिषदेच्या नूतन सभागृह उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली.