जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी पहाणीच्या अहवालानंतर दिले आदेश सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळणे येथील खनिज उत्खनन आणि खनिज वाहतूक थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
गेल्या गुरुवारी कळणे येथील खाणकाम तथा मायनिंग क्षेत्रात बांध फुटून गुरुवारी झालेल्या भीषण दुर्घटनेमध्ये चौदा घरे,चौदा लाख रुपये आणि लोकांच्या शेती बागायतीची प्रचंड हानी झाली.मायनिंगच्या मातीने अक्षरशः शेती आणि बागायती गिळंकृत केली. लोकांचे नुकसान झाल्याने जनमानसांत कळणे मायनिंगविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला.
त्या संतापाची दखल घेत कळणे दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी आणि खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांना घटनास्थळी पहाणी करायला पाठवून अहवाल मागवला.
त्या अहवालानंतर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कळणे मायनिंग मधील उत्खनन आणि खनिज वाहतूक तातडीने थांबविण्याचे आदेश दिले आहेत.