मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते व माऊली मित्रमंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे विश्वचषक उपविजेतेपद मिळवल्याबद्दल त्यांच्या डिजीटल सामाजिक समूहावर विशेष अभिनंदन केले आहे.
श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी अभिनंदन करताना सांगितले की अंतिम सामन्याचा निकाल जरी भारताच्या बाजुने लागला नसला तरी विश्वचषका सारख्या सर्वोच्च स्पर्धेत भारताने सलग १० सामने जिंकायची कामगिरी केली आहे त्याची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. एखाद्या सामन्यातील अपयश हे संघाचे एकंदर अपयश नसते कारण हा खेळ आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान तसेच बलाढ्य न्यूझीलंड व दक्षिण आफ्रीका संघांना भारताने मोठ्या फरकांनी हरवले ही कामगिरी कोणीच विसरु शकत नसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
भारतीय क्रिकेट संघातील आत्ताचे युवा खेळाडू आता भविष्यातील कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशा सदिच्छा राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाला दिल्या आहेत. भारतिय क्रिकेट संघाच्या चाहत्यांच्या पाठिब्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.