26.7 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

मालवणात श्री देव रामेश्वर- नारायण पालखी सोहळ्या मध्ये आमदार वैभव नाईक यांनी सहभागी होत घेतले दर्शन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी सोहळ्यात काल १४ नोव्हेंबरला ढोल ताशाच्या गजरात, फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

परंपरेने बलिप्रतिपदेच्या दिवशी हा पालखी सोहळा पार पडतो. असंख्य भाविक भक्तगण या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतात. यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक भक्तगणांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षीप्रमाणे आमदार वैभव नाईक यांनी पालखी प्रदक्षिणेत सहभागी होऊन श्री देव रामेश्वर – श्री देव नारायण देवतेचे दर्शन घेतले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवा सेना प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, अन्वय प्रभू, सन्मेष परब, तपस्वी मयेकर, मनोज मोंडकर, सिद्धेश मांजरेकर, हेमंत मोंडकर, करण खडपे, माजी नगरसेविका सेजल परब, माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, माधुरी प्रभू, युवा सेनेचे अक्षय भोसले आदींसह हजारोंच्या संख्येने मालवण वासीय उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी सोहळ्यात काल १४ नोव्हेंबरला ढोल ताशाच्या गजरात, फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.

परंपरेने बलिप्रतिपदेच्या दिवशी हा पालखी सोहळा पार पडतो. असंख्य भाविक भक्तगण या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतात. यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक भक्तगणांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षीप्रमाणे आमदार वैभव नाईक यांनी पालखी प्रदक्षिणेत सहभागी होऊन श्री देव रामेश्वर - श्री देव नारायण देवतेचे दर्शन घेतले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवा सेना प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, अन्वय प्रभू, सन्मेष परब, तपस्वी मयेकर, मनोज मोंडकर, सिद्धेश मांजरेकर, हेमंत मोंडकर, करण खडपे, माजी नगरसेविका सेजल परब, माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, माधुरी प्रभू, युवा सेनेचे अक्षय भोसले आदींसह हजारोंच्या संख्येने मालवण वासीय उपस्थित होते.

error: Content is protected !!