कुडाळ । देवेंद्र गावडे (उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या ग्रामपंचायत नेरुर देऊळवाडा, श्री देव कलेश्वर देवस्थान उपसमिती नेरुर व रिक्षा युनियन नेरुर चव्हाटा यांच्या संयुक्त विद्यमाने ११ नोव्हेंबरला शनिवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. या शिबीरात गांवातील एकुण १८० ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणी मध्ये २७ ग्रामस्थांच्या डोळ्यांत मोती बिंदू असल्याचे निदान करण्यात आले आणि त्यांची मोती बिंदू शस्त्रक्रिया मोफत करुन देण्यात येणार आहे. १२५ ग्रामस्थांना मोफत चष्मा वाटप, बी.पी. व शुगर मोफत तपासणी करण्यात आली आहे.
ऑनलाईन सुविधा शिबिराच्या माध्यमातून आधार कार्ड, आयुष्मान कार्ड काढणे, आधार कार्ड मोबाईल लिंक व अपडेट करणे याचा गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
शिबीर कार्यक्रमास सरपंच सौ.भक्ती निलेश घाडीगांवकर, उपसरपंच श्री. दत्ताराम शांताराम म्हाडदळकर, देवस्थान समिती अध्यक्ष श्री. प्रदीप जयराम नाईक, सदस्य श्री. चारुदत्त देसाई, श्री. शेखर गावडे, श्री. निलेश मेस्त्री व श्री. निळकंठ नेरुरकर तसेच रिक्षा युनियन अध्यक्ष श्री.गुरु साऊळ व सदस्य व ग्रा. पं. सर्व सदस्य तसेच तंटामुक्त समिती अध्यक्षा सौ.लक्ष्मी बापू सडवेलकर, पो. पाटील श्री. गणपत गोविंद मेस्त्री, सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व आशा स्वयंसेविका, सर्व अंगणवाडी सेविका, सर्व सी. आर. पी. उपस्थित होते.
नेरूर ग्रामस्थांनी या बहुउद्देशीय शिबिराबद्दल समाधान व्यक्त करुन आभार मानले.