मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या मामा वरेरकर नाट्यगृहात १३ नोव्हेंबरला आरमारी गाबीत समाज संस्थेच्या वतीने दिवाळीचे औचित्य साधून किल्ले व आकाश कंदिल बनविणे अशा अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ वर्षांखालील व १४ वर्षांवरील अशा दोन गटात असून ती मालवण तालुका स्तरीय असेल.
१४ वर्षांखालील छोट्या गटामध्ये प्रथम पारितोषिक २००१/, द्वितीय क्रमांक पारितोषिक १००१/ तर तृतीय क्रमांकाला ७०१/_ रुपयांचे पारितोषिक जाहीर केले गेले आहे.
१४ वर्षांवरील मोठ्या गटामध्ये प्रथम पारितोषिक ३००१/, द्वितीय क्रमांक पारितोषिक २००१/ तर तृतीय क्रमांकाला १००१/_ रुपयांचे पारितोषिक जाहीर केले गेले आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना गाबीत समाज स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रही वितरीत केले जाणार आहे.
सहभागी स्पर्धक कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती व आकाश कंदिल निर्मिती करु शकतील.
श्री. दामाजी मेथर (९४२२९६४१६३), सौ. स्वप्नाली बाबाजी तारी ( ९४२२२९२२४७) , श्री निशाकांत पराडकर (८९९९७४९१८५) यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे. १० नोव्हेंबर २०२३ ही नांव नोंदणीची अंतिम तारीख असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
आरमारी गाबीत समाज संस्थेच्या या अनोख्या स्पर्धेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे व सहभागी व्हावे असे आवाहन आरमारी गाबीत समाज संस्थेच्या पदाधिकारी वर्गाने केले आहे.