मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या वतीने यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस फारच कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी आत्ताचं कमी झाली आहे म्हणून कणकवली तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व के. टी. बंधाऱ्यात पाणी लवकरात लवकर अडवून पाण्याचा साठा केल्या मुळे एप्रिल, मे महिन्यात होणारा पाण्याचा दुष्काळ थोड्याफार प्रमाणात कमी होण्यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच पाणी अडवण्यासाठी ज्या प्लेट वापरल्या जातात त्या चांगल्या दर्जाच्या असाव्यात जेणेकरून अडविलेले पाणी वाहून जाऊ नये. याची काळजी घेण्यात यावी. असे सुचविण्यात आले.
उपकार्यकारी अभियंता श्री संदीप निखारे यांच्याशी चर्चा करतेवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाण्याचा वापर केला जात नाही अशीहि खंत व्यक्त केली. त्याचप्रमाणे या निवेदनाचा विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
निवेदन देताना उपस्थित लघु पाटबंधारे विभाग सिंधुदुर्ग नगरी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. विजय खोचरे, तसेच ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री . संतोष नाईक तसेच जिल्हा सचिव श्री. अर्जुन परब उपस्थित होते.