ब्युरो न्यूज | मुंबई : देशातील हाॅटेल रेस्टॉरंट आणि तथा व्यावसायिकांसाठी एल पी जी गॅस सिलिंडरच्या दरात १०१ रुपयांची वाढ झाली आहे. १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमतींत ही वाढ झाली आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतींत मात्र आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कमर्शियल सिलेंडरच्या दरांत वाढवण्यात आलेल्या किमतींचा प्रभाव खाद्य उद्योग आणि रेस्टॉरंट व्यवसाय दरांवर नाईलाजाने दिसून येईल असे काही व्यावसायिकांनी सांगितले आहे.
आज १ नोव्हेंबरपासून, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत १७८५.५०रुपयांवर आली असून १०१.५०रुपयांनी महागली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर १६८४ रुपये होते. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर वापरतात. त्याचा घरगुती वापर करता येत नाही. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या वजनात फरक आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १९ किलो वजनाचा असतो आणि घरगुती एलपीजी सिलेंडर १४.२ किलो वजनाचा असतो.