26.6 C
Mālvan
Friday, April 25, 2025
IMG-20240531-WA0007

उद्या ‘चलो रत्नागिरी’ ; रिक्षा चालक – मालक एकत्रीकरण व समृद्धीसाठी दिली गेली हाक.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : राजकारण विरहीत रिक्षा चालक- मालक यांच्या समृद्धी साठी व न्याय हक्कासाठी लढण्यासाठी उद्या २८ ऑक्टोबरला रत्नागिरीत १०:३० वाजता चर्चासत्र आयोजीत करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यातील विविध भागातील रिक्षाचालकांनी भाग घेवून आपले विचार व समस्या मांडाव्यात. या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी रिक्षा चालक मालक कृती समिती पुणेचे सरचिटणीस नितीन पवार यांच्यासह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक – मालक प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या प्रसंगी संपूर्ण जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

“राजकारण विरहित रिक्षा चालकांच्या हितासाठी एकत्रित लढा उभारुया आणि रिक्षाचालकांना समृद्ध बनवूया” अशा संकल्पनेवर संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड, जिल्ह्यांमधे येणाऱ्या काळात मुक्त रिक्षा परवाना वाटपासह दुचाकी टॅक्सी परवाना तसेच ई रिक्षा विना परमिट देण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. तसेच शासनाने बदललेल्या धोरणामुळे रिक्षा व्यावसायिकांना व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. आपल्या कुटुंबाच्या उपजिविकेसह मुलांचे शिक्षण वैद्यकीय खर्च व इतर खर्च करते वेळी शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्राच्या काही भागात रिक्षा व्यावसाय ठप्प झाल्याने कर्जबाजारी होवून काही रिक्षाचालकांनी आत्महत्येचा पर्याय निवडला आहे. यामधे काही रिक्षाचालक मृत्युमुखी देखील पडले आहेत. परिवहन विभाग व पोलिस प्रशासन यांच्यामुळे रिक्षाचालकांना व्यवसाय करणे कठीण होत चालले आहे. या जुलूमशाही विरोधात जन आंदोलन करुन आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी उद्या रत्नागिरीतील आयोजित चर्चा सत्रात जिल्ह्यातील विविध भागातील रिक्षाचालकांनी भाग घेवून आपले विचार व समस्या मांडाव्यात. या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी रिक्षा चालक मालक कृती समिती पुणेचे सरचिटणीस नितीन पवार यांच्यासह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालकाचे प्रतिनिधि उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत असे सांगण्यात आले आहे.

या चर्चा सत्रात श्री. नितीन पवार (सरचिटणीस रिक्षा चालक मालक कृती समिती पुणे.), श्री. संतोष भि. नाईक (कार्याध्यक्ष -कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ.), श्री. सुधिर पराडकर (सहसचिव- कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

श्री.प्रताप भाटकर (अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा रिक्षा चालक मालक असोसिएशन – रत्नागिरी.), श्री. दिलीप खेतले (अध्यक्ष- रिक्षा चालक-मालक संघटना. चिपळूण.), श्री. सुनील भालेकर (अध्यक्ष रिक्षा चालक-मालक संघटना खेड.) श्री. लवू कांबळे (अध्यक्ष रिक्षा चालक-मालक संघटना. लांजा.) श्री.संतोष सातवसे (सचिव, रिक्षा चालक-मालक संघटना राजापूर.) श्री. अशोक वाडेकर (अध्यक्ष स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटना.रत्नागिरी.), तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री राजकुमार तळेकर – कणकवली (तरळे), जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. नागेश ओरसकर (ओरस ), श्री.महेश मयेकर अध्यक्ष रिक्षा चालक मालक संघटना (मालवण), श्री.भरत तळवडेकर कणकवली, श्री.रवि माने कुडाळ तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी व रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

दत्त कृपा मंगल कार्यालय, नवीन नगरपरिषद भाजी मार्केट जवळ, रत्नागिरी येथे हे चर्चासत्र आयोजीत करण्यात आले आहे व अधिक माहितीसाठी श्री. प्रताप भाटकर (९७६५३९८९९८) यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व पदाधिकारी व रिक्षा चालक मालक यांनी वेळेवर उपस्थित राहावे अशी विनंती निमंत्रक श्री प्रताप भाटकर व सहकारी यांनी केली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : राजकारण विरहीत रिक्षा चालक- मालक यांच्या समृद्धी साठी व न्याय हक्कासाठी लढण्यासाठी उद्या २८ ऑक्टोबरला रत्नागिरीत १०:३० वाजता चर्चासत्र आयोजीत करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यातील विविध भागातील रिक्षाचालकांनी भाग घेवून आपले विचार व समस्या मांडाव्यात. या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी रिक्षा चालक मालक कृती समिती पुणेचे सरचिटणीस नितीन पवार यांच्यासह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक - मालक प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या प्रसंगी संपूर्ण जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

"राजकारण विरहित रिक्षा चालकांच्या हितासाठी एकत्रित लढा उभारुया आणि रिक्षाचालकांना समृद्ध बनवूया" अशा संकल्पनेवर संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड, जिल्ह्यांमधे येणाऱ्या काळात मुक्त रिक्षा परवाना वाटपासह दुचाकी टॅक्सी परवाना तसेच ई रिक्षा विना परमिट देण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. तसेच शासनाने बदललेल्या धोरणामुळे रिक्षा व्यावसायिकांना व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. आपल्या कुटुंबाच्या उपजिविकेसह मुलांचे शिक्षण वैद्यकीय खर्च व इतर खर्च करते वेळी शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्राच्या काही भागात रिक्षा व्यावसाय ठप्प झाल्याने कर्जबाजारी होवून काही रिक्षाचालकांनी आत्महत्येचा पर्याय निवडला आहे. यामधे काही रिक्षाचालक मृत्युमुखी देखील पडले आहेत. परिवहन विभाग व पोलिस प्रशासन यांच्यामुळे रिक्षाचालकांना व्यवसाय करणे कठीण होत चालले आहे. या जुलूमशाही विरोधात जन आंदोलन करुन आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी उद्या रत्नागिरीतील आयोजित चर्चा सत्रात जिल्ह्यातील विविध भागातील रिक्षाचालकांनी भाग घेवून आपले विचार व समस्या मांडाव्यात. या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी रिक्षा चालक मालक कृती समिती पुणेचे सरचिटणीस नितीन पवार यांच्यासह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालकाचे प्रतिनिधि उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत असे सांगण्यात आले आहे.

या चर्चा सत्रात श्री. नितीन पवार (सरचिटणीस रिक्षा चालक मालक कृती समिती पुणे.), श्री. संतोष भि. नाईक (कार्याध्यक्ष -कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ.), श्री. सुधिर पराडकर (सहसचिव- कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

श्री.प्रताप भाटकर (अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा रिक्षा चालक मालक असोसिएशन - रत्नागिरी.), श्री. दिलीप खेतले (अध्यक्ष- रिक्षा चालक-मालक संघटना. चिपळूण.), श्री. सुनील भालेकर (अध्यक्ष रिक्षा चालक-मालक संघटना खेड.) श्री. लवू कांबळे (अध्यक्ष रिक्षा चालक-मालक संघटना. लांजा.) श्री.संतोष सातवसे (सचिव, रिक्षा चालक-मालक संघटना राजापूर.) श्री. अशोक वाडेकर (अध्यक्ष स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटना.रत्नागिरी.), तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री राजकुमार तळेकर - कणकवली (तरळे), जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. नागेश ओरसकर (ओरस ), श्री.महेश मयेकर अध्यक्ष रिक्षा चालक मालक संघटना (मालवण), श्री.भरत तळवडेकर कणकवली, श्री.रवि माने कुडाळ तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी व रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

दत्त कृपा मंगल कार्यालय, नवीन नगरपरिषद भाजी मार्केट जवळ, रत्नागिरी येथे हे चर्चासत्र आयोजीत करण्यात आले आहे व अधिक माहितीसाठी श्री. प्रताप भाटकर (९७६५३९८९९८) यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व पदाधिकारी व रिक्षा चालक मालक यांनी वेळेवर उपस्थित राहावे अशी विनंती निमंत्रक श्री प्रताप भाटकर व सहकारी यांनी केली आहे.

error: Content is protected !!