जिल्हा नाट्यप्रेमींना खूप मोठ्या आनंदाचा दिलासा..!
कोरोनाचे सर्व नियम पाळूनच स्पर्धा सुरु होणार…!
कणकवली | उमेश परब : दरवर्षी २४ डिसेंबर रोजी होणारी, वसंतराव प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘बॅरिस्टर नाथ पै एकांकिका स्पर्धा’, यावर्षीही संस्थेने जाहीर केली आहे .कोरोना काळातील सरकारचे नियम अमलात आणून ही स्पर्धा घेतली जाईल . गतवर्षी संस्थेने नाथ पै एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली होती . त्या स्पर्धेतील शालेय गटातील ४ व खुल्या गटातील ६ पारितोषिक विजेत्या एकांकिका व प्रथितयश लेखकांच्या शालेय गटातील ३ व खुल्या गटातील १७ एकांकिकांमधील एकांकिका सादर करणाऱ्या संघांना प्राधान्य देण्यात येईल . या व्यतिरिक्त अन्य एकांकिकाही सादर करता येतील .
या स्पर्धेत शालेय गटात कमाल १० एकांकिका तर खुल्या गटात कमाल १५ एकांकिकांना प्रवेश देण्यात येईल . या स्पर्धेत खुल्या गटासाठी अनुक्रमे ₹ १५,००० , ₹ १०,००० व ₹ ७,००० तर शालेय गटासाठी ₹ ५००० , ₹ ३००० व ₹ २००० अशी सांघिक रोख पारितोषिके , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते तर अभिनय स्त्री पुरुष , दिग्दर्शन , नेपथ्य यासाठीही रोख पारितोषिके , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र स्वतंत्रपणे देण्यात येतील . स्पर्धेत एकूण ६० हजार रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत . ” एकांकिका स्पर्धा कणकवली येथे दिनांक २५ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२१ या कालावधीत घेतली जाईल . स्पर्धेची प्रवेश फी दोन्ही गटासाठी ₹ ५०० / – एवढी असून स्पर्धेचा प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे .अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्यवाह श्री शरद सावंत यांच्या ९४२२५८४०५४ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष एडव्होकेट एन . आर . देसाई यांनी केले आहे .