आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा वरची चावडी येथे श्री बाबू परुळेकर पुरस्कृत भव्य जिल्हास्तरीय दांडिया स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. श्री. बाळगोपाळ मंडळ वरची चावडी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा आज २२ ऑक्टोबरला रात्री १० वाजता सुरु होणार आहे. श्री बाळगोपाळ मंडळ, आचरा पटांगण येथे ही स्पर्धा संपन्न होईल
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक : रोख रु. ७७७७/- व चषक, द्वितीय पारितोषिक : रोख रु. ५५५५/- व चषक, तृतिय पारितोषिक : रोख रु. ३३३३/- व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेमध्ये कमीत – कमी ६ जोड्या जास्तीत जास्त १० जोड्या असाव्यात. रंगभूषा, वेशभूषा व पदन्यास व चेहऱ्या वरील हावभाव यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल . स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला ३० मिनिटे देण्यात येतील. २५ मिनिटे झाल्यानंतर १ बेल देण्यात येईल. गाण्याचे रेकॉर्ड स्वतः संघाने आणायचे आहे. त्यामध्ये सादर केले जाणारे एकच गाणे असेल. संघांचा क्रम चिठ्या उडवून देण्यात येईल. तरी सर्व संघांनी वेळेत स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित रहावे. स्पर्धेच्या वेळे अगोदर अर्धा तास हजर राहणे. स्पर्धेचे सर्व अधिकार आयोजकांकडे राहतील असे स्पर्धेचे मुख्य नियम व अटी आहेत.
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी श्री. दिपक आचरेकर ९४०४४४८५८०, श्री. शैलेश शेट्ये ९४२१२६३२१२, श्री. दाजी आचरेकर ९४२००२६८७२३ यांच्याशी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.