27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

‘भाग निधी भाग’ ; रोझरी इंग्लिश स्कूलची कु. निधी चंदन कांबळी करणार विभागीय स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व..!

- Advertisement -
- Advertisement -

ओरोस येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूलची कु. निधी चंदन कांबळी व वेदांत कुर्ले यांची चमक..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलने जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. १३ व १४ ऑक्टोबरला ओरोस येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये गोळाफेक या प्रकारात रोझरी इंग्लिश स्कूल मालवणच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये कु. वेदांत कुरळे याचा तिसरा क्रमांक आला. १०० मी. धावणे या प्रकारामध्ये मधील कु. निधी चंदन कांबळी हिने पहिला क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी आता ती विभागाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. मालवणचे क्रीडा समन्वयक अजय शिंदे सर यांनी तिला गुलाबपुष्प देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कु. निधी कांबळी व वेदांत कुरळे यांना लाभलेले क्रीडा शिक्षक तसेच पालक यांची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्सालविस यांनी देखील त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मालवण तालुक्यातील चौके गांवानजिकच्या आंबेरी सारख्या ग्रामीण व दुर्गम भागातून येऊन घवघवीत यश मिळवणार्या कु. निधी चंदन कांबळी हिची ॲथलेटीक्स मधिल ही कामगिरी सध्या कौतुकाचा विषय आहे. तिच्या आगामी स्पर्धांसाठी तिची दौड अशीच चालू रहावी म्हणून तिच्या यासाठी तिच्या शाळेतील सर्वजण, ” भाग निधी भाग..” अशाच शुभेच्छाही देत आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ओरोस येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूलची कु. निधी चंदन कांबळी व वेदांत कुर्ले यांची चमक..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलने जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. १३ व १४ ऑक्टोबरला ओरोस येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये गोळाफेक या प्रकारात रोझरी इंग्लिश स्कूल मालवणच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये कु. वेदांत कुरळे याचा तिसरा क्रमांक आला. १०० मी. धावणे या प्रकारामध्ये मधील कु. निधी चंदन कांबळी हिने पहिला क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी आता ती विभागाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. मालवणचे क्रीडा समन्वयक अजय शिंदे सर यांनी तिला गुलाबपुष्प देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कु. निधी कांबळी व वेदांत कुरळे यांना लाभलेले क्रीडा शिक्षक तसेच पालक यांची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्सालविस यांनी देखील त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मालवण तालुक्यातील चौके गांवानजिकच्या आंबेरी सारख्या ग्रामीण व दुर्गम भागातून येऊन घवघवीत यश मिळवणार्या कु. निधी चंदन कांबळी हिची ॲथलेटीक्स मधिल ही कामगिरी सध्या कौतुकाचा विषय आहे. तिच्या आगामी स्पर्धांसाठी तिची दौड अशीच चालू रहावी म्हणून तिच्या यासाठी तिच्या शाळेतील सर्वजण, " भाग निधी भाग.." अशाच शुभेच्छाही देत आहेत.

error: Content is protected !!