29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

भाजप नेते व माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने किर्लोस- गोठणे पुलासाठी २७ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ – मालवण मतदार संघात भाजप नेते व माजी खासदार डाॅ निलेश राणे यांच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांपासूनची मागणी असलेल्या तसेच कणकवली व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या किर्लोस चव्हाणवाडी ते गोठणेमाळ होडीचे साने ‘ग्रामीण मार्ग ४५८’ या रस्त्यावरील पुलासाठी नाबार्ड अंतर्गत २७ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

हे काम पूर्णत्वाकडे गेल्यानंतल किर्लोस ते गोठणे पंचक्रोशीतील नागरिकांसाठी प्रवास करणे सोयीचे होणार आहे. किर्लोस व गोठणे रामगड पंचक्रोशीतील लोकांकडून या पुलासाठी अनेक वर्षांची मागणी होत होती. किर्लोस ग्रामस्थांनी भाजपा नेते डाॅ निलेश राणे यांचे या विषयावर लक्ष वेधल्यानंतर निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून किर्लोस चव्हाणवाडी ते गोठनेमाळ मार्गे होडीचे साने ग्रा. मा. ४५८ किमी. ९/१०० येथे नवीन पूल बांधणे या कामासाठी सत्तावीस कोटी पन्नास लक्ष एवढ्या निधीची मागणी केली होती त्यानुसार निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

किर्लोस-गोठणे पुलासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगांवकर, सामाजिक कार्यकर्ते दिपक जाधव, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणेश ऊर्फ गजू बाक्रे, बाळा ऊर्फ अर्जुनलाड, सतीश नलावडे, प्रकाश भावे, भाजपचे सोशल मीडिया मालवण तालुका संयोजक शुभम बाक्रे तसेच भाजप युवा मोर्चाचे अभिमन्यू लाड, विनोद भावे, गोठणे सरपंच सौ. दीप्ती हाटले यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ - मालवण मतदार संघात भाजप नेते व माजी खासदार डाॅ निलेश राणे यांच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांपासूनची मागणी असलेल्या तसेच कणकवली व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या किर्लोस चव्हाणवाडी ते गोठणेमाळ होडीचे साने 'ग्रामीण मार्ग ४५८' या रस्त्यावरील पुलासाठी नाबार्ड अंतर्गत २७ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

हे काम पूर्णत्वाकडे गेल्यानंतल किर्लोस ते गोठणे पंचक्रोशीतील नागरिकांसाठी प्रवास करणे सोयीचे होणार आहे. किर्लोस व गोठणे रामगड पंचक्रोशीतील लोकांकडून या पुलासाठी अनेक वर्षांची मागणी होत होती. किर्लोस ग्रामस्थांनी भाजपा नेते डाॅ निलेश राणे यांचे या विषयावर लक्ष वेधल्यानंतर निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून किर्लोस चव्हाणवाडी ते गोठनेमाळ मार्गे होडीचे साने ग्रा. मा. ४५८ किमी. ९/१०० येथे नवीन पूल बांधणे या कामासाठी सत्तावीस कोटी पन्नास लक्ष एवढ्या निधीची मागणी केली होती त्यानुसार निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

किर्लोस-गोठणे पुलासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगांवकर, सामाजिक कार्यकर्ते दिपक जाधव, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणेश ऊर्फ गजू बाक्रे, बाळा ऊर्फ अर्जुनलाड, सतीश नलावडे, प्रकाश भावे, भाजपचे सोशल मीडिया मालवण तालुका संयोजक शुभम बाक्रे तसेच भाजप युवा मोर्चाचे अभिमन्यू लाड, विनोद भावे, गोठणे सरपंच सौ. दीप्ती हाटले यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!