मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या ग्रामीण रुग्णालयात, शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या पुढाकाराने मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोतीबिंदू तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. काल ९ ऑक्टोबरला सकाळी १० ते ५ अशा वेळेत हे शिबीर आयोजीत करण्यात आले होते. मालवण शहर व आसपासच्या भागातील गरजूंनी ‘मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया’ यासाठी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी यापूर्वी केले होते.

काल संपन्न झालेल्या मोतीबिंदू तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ६० जणांची मोतीबिंदू तपासणी झाली तर २५ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शिबिराबद्दल माजी बांधकाम सभापती मंदार केणी व सहकार्यांचे रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.

या शिबिराच्या आयोजनाबद्दल बोलताना माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी सामाजिक दृष्ट्या अत्यावश्यक सर्व सेवा, तसेच आरोग्य सेवांबद्दल आपण, आपले सहकारी व शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) सतत प्रयत्नशील रहाणार असून नागरिकांच्या आरोग्य समस्या उद्भवू नयेत म्हणूनही पाठपुरावा करत राहू असे सांगितले. माजी नगरसेवक मंदार केणी यांनी या शिबिराला सहकार्य केलेल्या सर्व नेत्र तज्ञ डाॅक्टर वर्गाचे, शल्य चिकित्सकांचे व कर्मचारी वर्गाचे आभार मानले व भविष्यातही त्यांचे सहकार्य मिळतच राहील अशी आशा व्यक्त केली.