मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात होणारा धामापूर नळपाणी योजनेचा पाणी पुरवठा आज तांत्रिक कारणांमुळे होऊ शकत नसल्याचे नगरपरिषद मार्फत सांगण्यात आले आहे. आज ३ ऑक्टोबरला होणारा पाणीपुरवठा धामापूर येथील उच्चदाब ११ के व्ही विद्युत पुरवठ्या मधील ट्रान्सफाॅर्मरच्या उच्चदाब विज पुरवठ्या मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा होऊ शकत नाही व त्याबाबत खेद आहे असे मालवण नगरपरिषदेच्या धामापूर पाणी पुरवठा विभागाच्या अधिकृत सूत्रांकडून जाहीर केले गेले आहे. नागरीकांनी या तांत्रिक कारणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -