मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या सांगेली येथील सत्वशीला पांडुरंग सावंत भोसले यांचे नुकतेच अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार असून मिरा रोड भाईंदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा उपसंघटक सौ जयलक्ष्मी जयराम सावंत यांच्या त्या सासूबाई होत.