25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

बांदा शहरात कट्टा कॉर्नर येथे शिवशौर्य यात्रेचे झाले जंगी स्वागत..!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा शहरात काल ३० सप्टेंबरला दुपारी शिवशौर्य यात्रेचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. शिवराज्याभिषेकचे ३५० वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषदेचे हिरक महोत्सवी वर्ष या औचित्यावर आयोजित ही यात्रा कोकण प्रांताचा प्रवास करणार आहे. दोडामार्ग येथून आलेल्या या यात्रेचे सर्वप्रथम गडगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारककडे स्वागत करण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत यात्रा बांदा शहरात दाखल झाली. कट्टा कॉर्नर येथे विविध संघटनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यात्रेचे स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, बांदा सरपंच प्रियांका नाईक, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर, माजी सभापती शीतल राऊळ, उद्योजक भाऊ वळंजू, मानसी धुरी, ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर, श्रेया केसरकर, रेश्मा सावंत, दिपलक्ष्मी सावंत-पटेकर, माधवी गाड, वाफोली उपसरपंच विनेश गवस, इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर, भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर, गुरुनाथ सावंत, शैलेश केसरकर, भैय्या गोवेकर, सुदन केसरकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, संदेश पावसकर, निलेश सावंत-पटेकर, अक्षय मयेकर, निलेश मोरजकर, केदार कणबर्गी, भूषण सावंत, नारायण बांदेकर, अशोक परब, विराज परब, शुभम बांदेकर,राकेश परब, संजय भाईप,शैलेश गवस यांच्या सह हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान बांद्यातील अनेक संघटनानी पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर ही यात्रा सावंतवाडी कडे रवाना झाली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा शहरात काल ३० सप्टेंबरला दुपारी शिवशौर्य यात्रेचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. शिवराज्याभिषेकचे ३५० वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषदेचे हिरक महोत्सवी वर्ष या औचित्यावर आयोजित ही यात्रा कोकण प्रांताचा प्रवास करणार आहे. दोडामार्ग येथून आलेल्या या यात्रेचे सर्वप्रथम गडगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारककडे स्वागत करण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत यात्रा बांदा शहरात दाखल झाली. कट्टा कॉर्नर येथे विविध संघटनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यात्रेचे स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, बांदा सरपंच प्रियांका नाईक, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर, माजी सभापती शीतल राऊळ, उद्योजक भाऊ वळंजू, मानसी धुरी, ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर, श्रेया केसरकर, रेश्मा सावंत, दिपलक्ष्मी सावंत-पटेकर, माधवी गाड, वाफोली उपसरपंच विनेश गवस, इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर, भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर, गुरुनाथ सावंत, शैलेश केसरकर, भैय्या गोवेकर, सुदन केसरकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, संदेश पावसकर, निलेश सावंत-पटेकर, अक्षय मयेकर, निलेश मोरजकर, केदार कणबर्गी, भूषण सावंत, नारायण बांदेकर, अशोक परब, विराज परब, शुभम बांदेकर,राकेश परब, संजय भाईप,शैलेश गवस यांच्या सह हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान बांद्यातील अनेक संघटनानी पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर ही यात्रा सावंतवाडी कडे रवाना झाली.

error: Content is protected !!