27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

मुंबई-गोवा महामार्गावर माणगांव जवळ एस टी बसचा भीषण अपघात ; १ मृत तर १९ जखमी.

- Advertisement -
- Advertisement -

ब्यूरो न्यूज | मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरती एस.टी .बस आणि कंटेनर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. एस.टी बसने कंटेनरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात घडला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगांव जवळ असणाऱ्या रेपोली येथे आज पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

या भीषण अपघातात एस.टी बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर १९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवासी गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. बसमधील इतर जखमी प्रवाशांवर माणगांव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईहून राजापूरकडे निघालेल्या एसटी बसला हा अपघात झाला आहे. अपघातात बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान गणेशोत्सवासाठी मुंबईहून शहरातील अनेक जण गांवी निघाले होते. अपघाताची माहिती मिळाताच वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरु केले. अपघातानंतर काही वेळ महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ब्यूरो न्यूज | मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरती एस.टी .बस आणि कंटेनर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. एस.टी बसने कंटेनरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात घडला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगांव जवळ असणाऱ्या रेपोली येथे आज पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

या भीषण अपघातात एस.टी बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर १९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवासी गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. बसमधील इतर जखमी प्रवाशांवर माणगांव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईहून राजापूरकडे निघालेल्या एसटी बसला हा अपघात झाला आहे. अपघातात बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान गणेशोत्सवासाठी मुंबईहून शहरातील अनेक जण गांवी निघाले होते. अपघाताची माहिती मिळाताच वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरु केले. अपघातानंतर काही वेळ महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत आहे.

error: Content is protected !!