मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी जाहीर करण्यात आलेल्या शिक्षक पुरस्कारांचे वितरण आज १० सप्टेंबरला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री मा.श्री.दीपक केसरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रजित नायर यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ शिक्षकांना शरद कृषी भवन येथे शिक्षक पुरस्कार वितरण करून सन्मानित करण्यात आले.
कणकवली तालुक्यातील शाळा घोणसरी नं.५ येथे कार्यरत असलेले उपशिक्षक, अखिल प्राथमिक शिक्षक संघ मालवणचे माजी अध्यक्ष श्री. विद्याधर पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सन २०२२/२३ चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देवून, पालकमंत्री मा.श्री. रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते त्यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
श्री. विद्याधर पाटील यांनी मालवण तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य केले . तसेच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा मालवणचे अध्यक्षपदही भूषविले. यानिमित्ताने अखिल प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुभाषचंद्र नाटेकर, श्री. राजेश भिरवंडेकर, श्री. परशुराम गुरव, मालवण तालुका सचिव श्री. गणेश सुरवसे, श्री. नामदेव एकशिंगे आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.