मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर नगरपरिषदेकडून ‘गणेशोत्सव २०२३’ साठी बांधकाम विभागामर्फत स्वच्छतेची कामे युध्दपातळीवर सुरु झाली असून गणेश मूर्ती विसर्जन स्थळांकडील गाळ काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गणेशोत्सव विसर्जन स्थळांकडील पापडी दुरुस्ती कामे सुद्धा हाती घेण्यात आली असून आरोग्य विभागाकडून रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडे झुडपे व गवत छाटणीचे कामही सुरु झाले आहे.
आरोग्य विभागाकडून डास प्रतिबंधात्मक फवारणी देखील सुरु केली गेली असून गणेशोत्सव २०२३ हा सण सुखकर साजरा होण्यासाठी मालवण नगरपरिषद प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे माध्यमांच्या मार्फत मालवण वासियांना दिली आहे.