मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुकास्तरीय शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धांना शुक्रवारी ११ ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे.
क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दरवर्षीच्या शालेय तालुकास्तरीय १० खेळांच्या स्पर्धांना शुक्रवारी ११ तारखेला, ‘जनता विद्या मंदिर, त्रिंबक’ मालवण या ठिकाणी १४, १७ व १९ वर्षांखालील मुले मुली यांच्या शालेय फुटबॉल स्पर्धेने सुरुवात होत आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये फुटबॉल, कुस्ती, ज्युदो, बुद्धिबळ, कॅरम, खो खो,व्हाॅलीबॉल,कबड्डी, मैदानी स्पर्धा व लेदर बॉल क्रिकेट या खेळांचा समावेश आहे. मालवण तालुक्यातील सर्व माध्यमिक, प्राथमिक शाळा यांनी आपल्या शाळेतील इयत्ता सहावी ते बारावी मधील खेळाडू स्पर्धेमध्ये उतरवून स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन मालवण तालुका शालेय क्रीडा स्पर्धा समितीचे अध्यक्ष तहसीलदार माननीय वर्षा झालटे यांनी केले आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
१)फुटबॉल १४ , १७ व १९ वर्षाखालील सर्व गट मुले मुली ११ ऑगस्ट रोजी जनता विद्या मंदिर त्रिंबक मालवण.
२) कुस्ती १४, १७ व १९ वर्षाखालील सर्व गट मुले, मुली 12 ऑगस्ट रोजी ‘जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल’ मालवण.
३) जुदो १४, १७ व १९ वर्षाखालील सर्व गट मुले, मुली 14 ऑगस्ट रोजी ‘श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय, वायरी’ मालवण.
४) बुद्धिबळ १४, १७ व १९ वर्षाखालील सर्व गट मुले, मुली १७ रोजी वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कट्टा मालवण.
५) कॅरम १४, १७ व १९ वर्षाखालील सर्व गट मुले, मुली 18 ऑगस्ट रोजी वराडकर हायस्कूल व जुनियर कॉलेज कट्टा मालवण.
६)खो-खो १४ वर्षाखालील मुले मुली व १७ वर्षाखालील मुले १ सप्टेंबर रोजी श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी मालवण.
१७ वर्षाखालील मुली व १९ वर्षाखालील मुले, मुली 2 सप्टेंबर रोजी श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी मालवण.
७)व्हॉलीबॉल १४ वर्षाखालील मुले, मुली व १७ वर्षाखालील मुली ११ सप्टेंबर रोजी सौ इंदिराबाई वर्दम हायस्कूल विरणपोईप मालवण.
१७ वर्षाखालील मुले व १९ वर्षाखालील मुले, मुली १५ सप्टेंबर रोजी सौ. ई. द.वर्दम हायस्कूल विरणपोईप मालवण.
८) कबड्डी १४ वर्षाखालील मुले ,मुली व १७ वर्षाखालील मुली १४ सप्टेंबर रोजी ल. टो. कन्या शाळा मालवण.
१७ वर्षाखालील मुले व १९ वर्षाखालील मुले ,मुली १५ सप्टेंबर रोजी ल.टो. कन्या शाळा मालवण.
९) मैदानी स्पर्धा १४ वर्षाखालील मुले ,मुली व १७ वर्षाखालील मुली ३ ऑक्टोबर रोजी त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे मालवण.
१७ वर्षाखालील मुले व १९ वर्षाखालील मुले, मुली ४ ऑक्टोबर रोजी त्रिमूर्ती माध्यमिकविद्यालय शिरवंडे मालवण.
१०) लेदर बॉल क्रिकेट १४, १७ व १९ वर्षाखालील सर्व गट मुले ,मुली १३ व १३ ऑक्टोबर भ रोजी टोपीवाला बोर्डिंग मैदान मालवण.
(लेदर बॉल क्रिकेट सर्व गट दिनांक १३ ऑक्टोबर रोजी रिपोर्टिंग करतील, स्पर्धा १३ ऑक्टोबर रोजीच सुरू होईल. पुढे ती दोन दिवस चालणार आहे.)
तालुक्यातून सर्व मुख्याध्यापक ,क्रीडा शिक्षक यांनी आपल्या शाळेच्या प्राथमिक प्रवेशिका भरल्यावर एक प्रत स्पर्धा आयोजनात सुसूत्रता येण्यासाठी व स्पर्धा आयोजन सुरळीत पार पडण्यासाठी क्रीडा समन्वयक श्री अजय मधुकर शिंदे डॉ. श्रीधर सिताराम कुडाळकर हायस्कूल मालवण ९४२२३९४१८६ यांच्याकडे दिनांक उद्या १० ऑगस्ट पूर्वी द्यावी, असे आवाहन क्रीडा समिती सचिव गटशिक्षणाधिकारी श्री संजय माने यांनी केले आहे.
स्पर्धा दररोज सकाळी ९ वाजता चालू होतील. आपापल्या शाळेचे संघ जबाबदार संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक यांचे सोबत स्पर्धा स्थळी उपस्थित ठेवून सहकार्य करावे. स्पर्धेला निघण्यापूर्वी क्रीडा समन्वयक, स्पर्धा आयोजक, अथवा शाळेतील क्रीडा शिक्षक यांना फोन करून स्पर्धेची खात्री करावी व नंतरच स्पर्धेला निघावे तसेच वेळोवेळी होणारे बदल आपल्यापर्यंत पोहोचवले जातील असे आयोजन समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शालेय स्पर्धेसाठी शुभेच्छा