नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ३३४ कर्मचारी भरतीची प्रक्रिया जाहीर झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना फार मोठ्या भरतीची संधी प्राप्त होणार आहे. lwww.zpsindhudurg.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांना २५ ऑगस्ट २०२३ रात्री १२:०० पर्यंत पूर्वीच्या शैक्षणिक अहर्तेनुसार ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास संधी आहे. गट क मधील एकूण १७ संवर्गाच्या पदांसाठी ही भरती होत आहे. या भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात जिल्हा परिषद प्रशासनाने शुक्रवारी प्रसिद्ध केली आहे. आयबीपीएस मार्फत ऑनलाइन पद्धतीने व प्रत्येक संवर्गासाठी शंभर प्रश्नांच्या व दोनशे गुणांच्या ऑनलाइन परीक्षेद्वारे ही भरती प्रक्रिया होत आहे.
या १७ संवर्गामध्ये ३३४ पदे भरली जाणार असून, यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक १ पद, पुरुष आरोग्य सेवकांची ५५ पदे, महिला आरोग्य परिचारिकांची १२१ पदे, औषध निर्माता ११ पदे, कंत्राटी ग्रामसेवकांची ४५ पदे, कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा व बांधकाम २९ पदे, कनिष्ठ अभियंता विद्युत दोन पदे, कनिष्ठ लेखा अधिकारी दोन पदे, कनिष्ठ सहाय्यक लेखा चार पदे, तारतंत्री दोन पदे, मुख्य सेविका पर्यवेक्षक दोन पदे, पशुधन पर्यवेक्षक १८ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दोन पदे, वरिष्ठ सहाय्यक चार पदे, वरिष्ठ सहाय्यक लेखा सात पदे, विस्तार अधिकारी कृषी तीन पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २७ पदे एवढ्या ३३४पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या १७ संवर्गाच्या पदांसाठी जात निहाय तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक खेळाडू अपंग ही आरक्षणे ही आहेत.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ९०० रुपये तर माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी कोणतेही शुल्क नाही. दिलेल्या साईज मध्ये फोटो व सही योग्य पद्धतीने अपलोड करण्याच्या सूचनाही यात नमूद आहेत. उमेदवारांची वयोमर्यादा रिक्त पदांचा तपशील, वेतनश्रेणी परीक्षा संदर्भातील सूचना आधी सर्व माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. २५ ऑगस्ट रोजी रात्री ११:५९ वाजता ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया बंद होणार आहे. उमेदवारानी योग्य पद्धतीने अर्जात माहिती समाविष्ट करणे आवश्यक असून कोणतेही कागदपत्र यावेळी अपलोड करावयाचे नाहीत.
लेखी परीक्षा चे हॉल तिकीट उमेदवारांना परीक्षेच्या आधी सात दिवस उपलब्ध होणार असून त्यात वेळ, परीक्षा केंद्राचे ठिकाण व दिनांक नमूद असणार आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर त्याचा लागलीच निकाल जाहीर होणार असून उत्तर पत्रिका फेर तपासण्याची संधी उमेदवारांना राहणार नाही. उमेदवारांना अर्ज दाखल करताना काही तांत्रिक अडचणी आल्या तर या संकेतस्थळावर टोल फ्री क्रमांक हे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय निवड कमिटीच्या अध्यक्ष के मंजू लक्ष्मी तर सदस्य सचिव जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर आहेत.