26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

लेखन व पत्रकारितेची ‘शिरीष कणेकरी तोफ’ झाली शांत..!

- Advertisement -
- Advertisement -

एका अष्टपैलू लेखकाच्या पूर्णविरामाने लेखन विश्वात मोठी पोकळी.

सुयोग पंडित | मुख्य संपादक : सहज लेखनाची ‘कणेकरी तोफ’ आणि ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. आज सकाळी प्रकृती खालावल्यामुळे शिरीष कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. याच दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. शैलीदार बेधडक लेखक आणि फिल्मी गप्पांची मैफल रंगविणारे बहारदार वक्ते अशी शिरीष कणेकर ख्याती असलेल्या कणेकरांनी सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावर त्यांनी अत्यंत निर्भीड मार्मिमकतेने लेखन केले होता. ‘कणेकरी’, ‘फिल्लमबाजी’, ‘शिरीषासन’ हे त्यांचे विनोदी लेख महाराष्ट्र राज्याला अखंड स्मरणात आहेत. शिरीष कणेकर यांच्या निधनानंतर पत्रकारिता आणि लेखन क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

शिरीष कणेकर यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबी केलं. पत्रकार म्हणून त्यांनी इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांतून काम केलं आहे. याशिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना आणि जवळपास सगळ्याच मराठी वृत्तपत्रांतील त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे साप्ताहिक मनोहर, लोकप्रभा, चित्रलेखामधील त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. ‘लगाव बत्ती’ या त्यांच्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता.

रायगड जिल्ह्यातील पेण हे शिरीष कणेकर यांचं मूळ गाव. त्यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानात त्यांचे लहानपण गेले. शिरीष कणेकर हे मराठीतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार होते. क्रीडा आणि सिने-पत्रकारितेवर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. आधुनीक ललित साहित्यातील असंख्य वाचक व लेखकांचा दीपगृह अशी ओळख असलेल्या शिरीष कणेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

एका अष्टपैलू लेखकाच्या पूर्णविरामाने लेखन विश्वात मोठी पोकळी.

सुयोग पंडित | मुख्य संपादक : सहज लेखनाची 'कणेकरी तोफ' आणि ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. आज सकाळी प्रकृती खालावल्यामुळे शिरीष कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. याच दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. शैलीदार बेधडक लेखक आणि फिल्मी गप्पांची मैफल रंगविणारे बहारदार वक्ते अशी शिरीष कणेकर ख्याती असलेल्या कणेकरांनी सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावर त्यांनी अत्यंत निर्भीड मार्मिमकतेने लेखन केले होता. 'कणेकरी', 'फिल्लमबाजी', 'शिरीषासन' हे त्यांचे विनोदी लेख महाराष्ट्र राज्याला अखंड स्मरणात आहेत. शिरीष कणेकर यांच्या निधनानंतर पत्रकारिता आणि लेखन क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

शिरीष कणेकर यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबी केलं. पत्रकार म्हणून त्यांनी इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांतून काम केलं आहे. याशिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना आणि जवळपास सगळ्याच मराठी वृत्तपत्रांतील त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे साप्ताहिक मनोहर, लोकप्रभा, चित्रलेखामधील त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. 'लगाव बत्ती’ या त्यांच्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता.

रायगड जिल्ह्यातील पेण हे शिरीष कणेकर यांचं मूळ गाव. त्यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानात त्यांचे लहानपण गेले. शिरीष कणेकर हे मराठीतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार होते. क्रीडा आणि सिने-पत्रकारितेवर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. आधुनीक ललित साहित्यातील असंख्य वाचक व लेखकांचा दीपगृह अशी ओळख असलेल्या शिरीष कणेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

error: Content is protected !!