29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

पिंक रिक्षा ही संकल्पना लवकरच बांदा शहरात आणून रोटरी क्लबच्या सहाय्याने महिलांना करणार सक्षम ; मावळते अध्यक्ष रोटेरीअन मंदार कल्याणकर यांचा विश्वास.

- Advertisement -
- Advertisement -

रोटरी क्लब ऑफ बांदा वर्ष २०२३-२४ च्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या वर्ष २०२३-२४ च्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मंगळवारी १९ जुलैला श्री स्वामी समर्थ हॉल येथे संपन्न झाला. राष्ट्रगीत तसेच रोटरीच्या प्रार्थनेने सोहळा सुरू करण्यात आला. रोटरीचे संस्थापक पॉल हॅरिस यांना अभिवादन करून सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिरभाई बोरसाडवाला यांनी यंदाच्या संकल्पनेला पूरक असे प्रकल्प राबवणारा क्लब असा प्रशंसनीय गौरव केला. यावेळी त्यांनी मावळते प्रेसिडेंट मंदार कल्याणकर यांचेही कौतुक केले. तर प्रकल्पांचा संकल्प करतानाच त्याच्या सिद्धीचा दिशेने वाटचाल करणारा रोटरी क्लब असे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ यांनी मत व्यक्त केले. त्यांनी या प्रसंगी रोटरी पदाधिकारी, सदस्यांचे कौतुक केले.

मावळते अध्यक्ष रोटे. मंदार कल्याणकर यांनी आपल्या कारकीर्दीतील आढावा घेतानाच, कार्यकारिणी व इतर सदस्यांचे आभार मानत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले तसेच पिंक रिक्षा ही संकल्पना बांदा शहरात लवकर सत्यात आणून रोटरी च्या साह्याने महिलांना सक्षम करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला व नवीन अध्यक्ष रोटे. प्रमोद कामात यांना पुढील वर्षांची सूत्रे सोपविली. रोटरी सिक्रेटरी म्हणून फिरोझ ख़ान यांनी बाबा काणेकर यांना पदभार सोपवला. शिवानंद भिडे यांच्या कडे ट्रेजरर म्हणून पदभार सोपण्यात आला. यावेळी रोटरी क्लब बांदा या परिवारात नवीन आलेल्या आनंद गवस, विराज परब, उत्तम सातार्डेकर, अनंत नाडकर्णी, दिलीप घोगले या पाच नवीन सदस्यांना सामील करून त्यांचा परिचय देण्यात आला. तसेच अन्य कार्यकारिणी सदस्य यांना रोटरी पिन देण्यात आली.

यावेळी एजी सचिन गावडे, जिएए गजानन कांदळगावकर, जिएसआर आनंद रासम, पास्ट एजी नीता गोवेकर, सिद्धेश पावसकर, आबा धारगळकर, दिलीप कोरगांवकर, स्वागत नाटेकर, संतोष सावंत, रत्नाकर आगलावे, स्वप्नील धमापूरकर, प्रवीण शिरसाठ, सुनील राऊळ, वसंत राऊळ, योगेश परुळेकर, हनुमंत शिरोडकर, रोटरॅक्ट अध्यक्ष अक्षय मयेकर व इतर सदस्य उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!