बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील ‘बँक आँफ इंडिया शाखेत नुकताच किसान दिन साजरा करण्यात आला.’ शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या जात आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व आपले हित साधावे असे आवाहन बँक आँफ इंडिया बांदाचे वरिष्ठ शाखाप्रबंधक पवन कुलकर्णी यांनी केले. यावेळी श्री. कुलकर्णी बोलत होते. शेतकऱ्यांना विविध कर्जांची मंजुरी पत्रे, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध कृषी संबंधीत योजनांची माहिती दिली.
शेतकरी दत्ताराम परब, प्रशांत पंडित, संदिप बांदेकर, विलास नाडकर्णी, विष्णु गावडे, प्रकाश मांजरेकर, जगन्नाथ परब, नकुळ परब, वनिता झोरे, श्वेता गवस व अन्य शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमास अश्विनी अशोक, आशिष कुमार, नारायण न्हावी, बाळकृष्ण राऊळ, विनायक देसाई, रोशनी सोनी, हिमांशी गुर्रानी, अखिलेश त्रिवेदी हे अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. मकरंद नाईक यांनी शाखेमधील विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली व आभार मानले.