आचरा | प्रसाद टोपल व मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवच्या श्री. जयंती देवी कला-क्रीडा मंडळाचा आज पर्यावरण प्रेमी म्हणून सन्मान करण्यात आला. कुडाळ येथील मराठा हाॅल मध्ये नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने हा सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी व सेवा, वृक्षारोपण, आरोग्य , सांस्कृतिक , कला, क्रीडा , शैक्षणिक क्षेत्रात पळसंबचे हे नोंदणीकृत श्री .जंयतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ हे नेहमीच अग्रेसर आहे. या मंडळात गांवाबाहेर स्थायिक मूळ पळसंब निवासी सदस्य, ग्रामस्थ सदस्य व मंडळाचे पदाधिकारी नेहमीच सामाजिक क्षेत्रातील काळानुरुप गरजा ओळखून काम करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. गुणगौरव सन्मानचिन्ह व तुळशीच रोप असे सन्मानाचे स्वरुप होते.
हा सन्मान स्विकारण्यासाठी पळसंब देवस्थानचे मानकरी श्री . प्रकाश कापडी , सामाजिक कार्यकर्ते श्री .प्रमोद सावंत व मंडळाचे अध्यक्ष श्री . उल्हास सावंत, सचिव श्री . चंद्रकांत गोलतकर, श्री. अमित पुजारे, श्री . हितेश सावंत, श्री . शेखर पुजारे, श्री रुपेश पुजारे, अनुज गोलतकर उपस्थित होते. या सन्मानाबद्दल श्री. जयंती देवी कला क्रीडा मंडळ पळसंब यांची सिंधुदुर्ग जिल्हा व मुंबई स्थित पळसंब वासियांनीही प्रशंसा केली आहे.