कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक देखील सोबत उपस्थित.
रत्नागिरी | ब्युरो न्यूज : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरीवरुन सध्या एकंदर राजकारण तप्त आहे. या रिफायनरीबाबत अनेक पक्षांकडून आरोप – प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बारसूमध्ये दाखल झाले आणि त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की सद्य राज्यसरकारची देशात गद्दार म्हणून ओळख तसेच रिफानरीसाठी कोणत्याही थराला जात स्थानिक तसेच रिफायनरी विरोधी लोकांना त्रास देणे हाच त्यांनी घाट घातला आहे. सरकारने या स्थानिकांशी संवाद साधावा. लोकांना रिफायनरी नको असेल तर रिफायनरी करु नये आणि लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होणारच नाही. आपत्ती जनक प्रकल्प कोकणात नको असेही उद्धव ठाकरे यांनी प्रतिपादन केले.
यावेळी त्यांच्या समवेत कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.