27.5 C
Mālvan
Saturday, July 27, 2024
IMG-20240531-WA0007

नुसता ‘वूड ‘ नाही तर अचूक खिंडार पाडणारा ‘वूडपेकर…!’

- Advertisement -
- Advertisement -

क्रीडा विशेष | सुयोग पंडित : आय.पि.एल. २०२३ च्या कालच्या डबल हेडर मधील दुसरा व स्पर्धेतील तिसरा सामना दिल्ली कॅपीटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंटस् यांच्यात खेळवला गेला. तो सामना लक्षात राहिल फक्त आणि फक्त मार्क वूड नामक गोलंदाजाच्या अचूक व वेगवान मार्यासाठी. या पूर्वी चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळलेल्या मार्क वूडने काल त्याचा बळींचा पंजा खोलला म्हणजेच दिल्लीचे तब्बल पाच फलंदाज माघारी पाठवले. नुसते सहज माघारी नाही तर वूडच्या विस्मयकारी वेग व झपकन् काटा बदलणार्या स्विंगिंग वेगासमोर ते पाच फलंदाज अक्षरशः चारी मुंड्या चीत झाले. वूडने ४ षटकांत १४ धावा देऊन ५ बळी मिळवून लखनौ सुपर जायंटस् संघाला विजय मिळवून दिला.

वूड हा त्याच्या आय.पी.एल.कारकिर्दितला केवळ दुसराच सामना खेळत होता. यापूर्वी तब्बल ५ वर्षांपूर्वी त्याने चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याचा पहिला सामना खेळला होता. तब्बल ५ वर्षांनी पुन्हा आय.पी.एल. खेळताना वूडची आक्रमकता ही पहिल्या चेंडूपासूनच दिसत होती. आय.पी.एल.मध्ये कोणत्याही गोलंदाजांने एका डावात ५ बळी घ्यायची ही २७ वी वेळ होती परंतु त्या २७ पैकी सर्वोच्च ३ जणांतील अशीच त्याची कामगिरी आहे.

इंग्लंडच्या डरहॅम कडून खेळणार्या मार्क वूडचा जन्म ११ जानेवारी १९९० चा..म्हणजेच तो काही तरणाबांड युवा गोलंदाज नाही. इंग्लंड कडूनही एकदिवसीय सामन्यात त्याने २०१५ ला व कसोटीत २०१८ ला पदार्पण केले…वयाच्या थोडे उशिरानेच. मार्कला दुखापतींचाही थोडा ससेमीरा आहे. या ही आय. पी. एल. मध्ये तो किती तंदुरुस्त राहू शकेल ती शंकाच आहे परंतु त्याने लखनौ सुपर जायंटस् संघाला ज्या पद्धतीने दणदणीत सलामी मिळवून दिली त्या पद्धतीमुळे तो आता या संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून नेहमीच ‘सांभाळला’ जाईल.

५ पैकी ३ बळी होते पृथ्वी शाॅ, मिचेल मार्श आणि सर्फराझ़ ख़ान…! दिल्लीची संपूर्ण भीस्त असलेले त्रिकुट. सोबत कर्णधार व जगातील एक घणाघाती फलंदाज वाॅर्नरही जरी वूड समोर होता तरी तो धावा जमवू शकत नव्हता अशी टिच्चून वेगवान गोलंदाजी मार्क वूडने केली.

वूड पेकर…म्हणजे सुतार पक्षी..!
सुतार पक्षी कितीही टणक लाकडाला त्याच्या चोचीने खिंडार पाडू शकतो आणि तेच काम काल मार्क वूडच्या गोलंदाजी रुपी कौशल्याच्या चोचीने केले.

त्यामुळे मार्क वूड हा नुसता वूड नाही तर फलंदाजीला खिंडार पाडणारा अचूक ‘वुडपेकर’ आहे असेच म्हणावे लागेल.
सध्या बहरात असलेल्या मिचेल मार्शचा वूडने उडवलेला त्रिफळा एकदा आवर्जून पहा…’खिंडार’ कसे पडते ते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

क्रीडा विशेष | सुयोग पंडित : आय.पि.एल. २०२३ च्या कालच्या डबल हेडर मधील दुसरा व स्पर्धेतील तिसरा सामना दिल्ली कॅपीटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंटस् यांच्यात खेळवला गेला. तो सामना लक्षात राहिल फक्त आणि फक्त मार्क वूड नामक गोलंदाजाच्या अचूक व वेगवान मार्यासाठी. या पूर्वी चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळलेल्या मार्क वूडने काल त्याचा बळींचा पंजा खोलला म्हणजेच दिल्लीचे तब्बल पाच फलंदाज माघारी पाठवले. नुसते सहज माघारी नाही तर वूडच्या विस्मयकारी वेग व झपकन् काटा बदलणार्या स्विंगिंग वेगासमोर ते पाच फलंदाज अक्षरशः चारी मुंड्या चीत झाले. वूडने ४ षटकांत १४ धावा देऊन ५ बळी मिळवून लखनौ सुपर जायंटस् संघाला विजय मिळवून दिला.

वूड हा त्याच्या आय.पी.एल.कारकिर्दितला केवळ दुसराच सामना खेळत होता. यापूर्वी तब्बल ५ वर्षांपूर्वी त्याने चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याचा पहिला सामना खेळला होता. तब्बल ५ वर्षांनी पुन्हा आय.पी.एल. खेळताना वूडची आक्रमकता ही पहिल्या चेंडूपासूनच दिसत होती. आय.पी.एल.मध्ये कोणत्याही गोलंदाजांने एका डावात ५ बळी घ्यायची ही २७ वी वेळ होती परंतु त्या २७ पैकी सर्वोच्च ३ जणांतील अशीच त्याची कामगिरी आहे.

इंग्लंडच्या डरहॅम कडून खेळणार्या मार्क वूडचा जन्म ११ जानेवारी १९९० चा..म्हणजेच तो काही तरणाबांड युवा गोलंदाज नाही. इंग्लंड कडूनही एकदिवसीय सामन्यात त्याने २०१५ ला व कसोटीत २०१८ ला पदार्पण केले…वयाच्या थोडे उशिरानेच. मार्कला दुखापतींचाही थोडा ससेमीरा आहे. या ही आय. पी. एल. मध्ये तो किती तंदुरुस्त राहू शकेल ती शंकाच आहे परंतु त्याने लखनौ सुपर जायंटस् संघाला ज्या पद्धतीने दणदणीत सलामी मिळवून दिली त्या पद्धतीमुळे तो आता या संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून नेहमीच 'सांभाळला' जाईल.

५ पैकी ३ बळी होते पृथ्वी शाॅ, मिचेल मार्श आणि सर्फराझ़ ख़ान…! दिल्लीची संपूर्ण भीस्त असलेले त्रिकुट. सोबत कर्णधार व जगातील एक घणाघाती फलंदाज वाॅर्नरही जरी वूड समोर होता तरी तो धावा जमवू शकत नव्हता अशी टिच्चून वेगवान गोलंदाजी मार्क वूडने केली.

वूड पेकर…म्हणजे सुतार पक्षी..!
सुतार पक्षी कितीही टणक लाकडाला त्याच्या चोचीने खिंडार पाडू शकतो आणि तेच काम काल मार्क वूडच्या गोलंदाजी रुपी कौशल्याच्या चोचीने केले.

त्यामुळे मार्क वूड हा नुसता वूड नाही तर फलंदाजीला खिंडार पाडणारा अचूक 'वुडपेकर' आहे असेच म्हणावे लागेल.
सध्या बहरात असलेल्या मिचेल मार्शचा वूडने उडवलेला त्रिफळा एकदा आवर्जून पहा…'खिंडार' कसे पडते ते.

error: Content is protected !!