अंत्योदय योजनेच्या कार्डचा ठराव मांडायचा प्रस्ताव
मालवण | प्रतिनिधी : कोरोना तथा ‘कोविड 19’ च्या जागतिक महामारीत देशभरातील व आपल्या मालवण शहरातीलही अनेकांचे व्यवसाय बंद पडलेले आहेत व अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातच मालवण शहरातील ७१ जणांने जीव गमावला आहे अशा नागरिकांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा असे निवेदन नगरसेवक अप्पा लुडबे यांनी मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले आले.
मालवण शहरातील ७१ जणांपैकी अनेकजण कुटुंब प्रमुख होते त्यांच्या निधनाने त्यांची कुटुंबे आज निराधार झालेली आहेत.
अशा कुटुंबांना दोन वेळचे अन्न मिळतानही कठीण झाले आहे.
ज्यांच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेले आहे व जी कुटुंबे निराधार झालेली आहेत अशा कुटुंबियांचा सर्वे करून त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळण्यासाठी शहरातील नागरिकांसाठी नगरपरिषदेने ठराव घेणे आवश्यक आहे .
ठराव घेण्यात यावा व त्या नावांसहितची यादी मान. तहसीलदार यांच्याकडे देण्यात यावी जेणेकरून निराधार कुटुंबियांना शासनाच्या अंत्योदय योजनेचा लाभ घेऊन कमी दराचा धान्य मिळेल व त्यांना सुकर जीवन जगण्यास मदत होईल ,असे निवेदन नगरसेवक अप्पा लुडबे यांनी मुख्याधिकारी, मालवण नगरपरिषद यांना दिले आहे.